बाबांना शांती मिळाली असेल, पहलगाम हल्ल्यात मृत संजय लेलेंचा लेक गहिवरला, पुलवामा हल्ल्यानंतर वडिलांनी मला…

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने अत्यंत समाधानी असल्याची भावना व्यक्त केली आहे. जिथून आतंकवादी निघतात, त्या 9 जागांना टार्गेट केलेलं आहे, अशाच आणखी कारवाया व्हाव्यात ही इच्छा त्याने बोलून दाखवलीभारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं वृत्त आहे. भारताने राबवलेल्या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आल्याने भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली आहे. पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या डोंबिवली येथील संजय लेले यांच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने अत्यंत समाधानी असल्याची भावना व्यक्त केली आहे. जिथून आतंकवादी निघतात, त्या 9 जागांना टार्गेट केलेलं आहे, अशाच आणखी कारवाया व्हाव्यात ही इच्छा आहे, यांना पूर्ण नेस्तनाबूत करुन टाकलं पाहिजे. एक हजाराहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं पाहिजे, अशी इच्छा हर्षल संजय लेले याने बोलून दाखवली.या घटनेमुळे बाबांना शांती मिळाली असेल, हे बघून आम्हालाही बरं वाटलं. बाबा, माझे दोन्ही मामा आणि इतर 26 जणांनाही शांती मिळाली असेल. माझे बाबा देशासाठी मृत्युमुखी पडले. पाच वर्षांपूर्वी पुलवामा हल्ल्याचा सरकारने सूड घेतल्यानंतर माझ्या बाबांनी मला मिठी मारली होती, म्हणजेच त्यांना देशाची खऱ्या अर्थाने काळजी होती, त्यामुळे ते निश्चितच आनंदी असतील, अशा भावनाही हर्षल लेले याने व्यक्त केल्या.आमचा मामा फक्त बोलत होता की आम्हाला जाऊ द्या, त्याला काहीही दया न दाखवता थेट गोळी घातली, माझ्या दुसऱ्या मामासोबत आणि मग माझ्या बाबांसोबत तेच घडलं, त्यामुळे ऑपरेशन सिंदूर म्हणून त्यांनी केलेल्या एअरस्ट्राईकचा आम्हाला आनंद झाला आहे, असंही हर्षल लेले पुढे म्हणाला.माझी सरकारला एक विनंती आहे, की भारतावर पुन्हा एखादा हल्ला होण्याची वाट पाहत बसू नये, दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवून हा विषय संपवून टाकला पाहिजे, हा भारतावरचा शेवटचा हल्ला पाहिजे, असंही हर्षल म्हणाला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.