भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा एलओसीवर गोळीबार केला. यामध्ये तीन भारतीयांचा मृत्यू झाला आहे.नवी दिल्ली: भारताने पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर देत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील 9 दहशतवादी ठिकाणं उद्ध्वस्त केली आहेत. भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तान आता अस्वस्थ झाला आहे आणि त्याने पुन्हा एकदा भारतीयांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या १३-१४ दिवसांपासून पाकिस्तानकडून सतत सिझफायरचं उल्लंघन केलं जात आहे. तर, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा एलओसीवर गोळीबार केला. या गोळीबारात ३ भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.पाकिस्तानच्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पुंछ जिल्हा अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतीय लष्करानेही याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले आहे.










