सात गावांतील जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांनीच सर्वांशी चर्चा करून, कशा पद्धतीने मोबादला हवा आहे, याचा प्रस्ताव येत्या सात दिवसांत सरकारला द्यावा.‘पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या सात गावांतील जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांनीच सर्वांशी चर्चा करून, कशा पद्धतीने मोबादला हवा आहे, याचा प्रस्ताव येत्या सात दिवसांत सरकारला द्यावा. त्यावर मंत्रिमंडळात चर्चा करू,’ अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. कोणत्याही परिस्थितीत विमानतळ होणारच, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
शेतकऱ्यांनी प्रस्ताव दिला नाही, तर पुढील १५ दिवसांत सरकारकडून शेतकऱ्यांना चांगला मोबदला कशा स्वरूपात देता येईल, याचे पॅकेज जाहीर केले जाईल, असे संकेत बावनकुळे यांनी दिले.एखतपूर येथे सरकारी कर्मचारी, पोलिसांवर आंदोलकांनी शनिवारी दगडफेक केली. आंदोलनाला हिंसक वळण लागले. स्थानिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर, महसूलमंत्री बावनकुळे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.










