भटक्या कुत्र्याचा ७ वर्षीय मुलीला चावा; प्रतिबंधक लस घेऊनही रेबीजने मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं हे कारण.

 रेबीज प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही सात वर्षीय मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची घटना केरळमधील एका सरकारी रुग्णालयात सोमवारी घडली.रेबीज प्रतिबंधक लस घेतल्यानंतरही सात वर्षीय मुलीचा रेबीजमुळे मृत्यू झाल्याची घटना केरळमधील एका सरकारी रुग्णालयात सोमवारी घडल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. निया असे या मुलीचे नाव असून, ती लगतच्या कोल्लम जिल्ह्यातील कुन्नीकोड येथील रहिवासी होती.नियाला रेबीजचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर, मागील काही दिवस ती येथील श्री अविट्टम थिरुनल (एसएटी) रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होती. रेबीज प्रतिबंधक लस योग्य अंतराने घेतल्यानंतरही तिला रेबीजचा संसर्ग झाल्याचे कुटुंबीयांनी तसेच रुग्णालयातील डॉक्टरांनी शुक्रवारी म्हटले होते.

निया घराजवळ उभी असताना ८ एप्रिल रोजी एका भटक्या कुत्र्याने तिच्या कोपराचा चावा घेतला होता, अशी माहिती तिच्या आईने दिली. त्यानंतर लगेचच कुटुंबीयांनी तिच्या जखमा योग्यरित्या धुवून तिला जवळच्या कौटुंबिक आरोग्य केंद्रात नेले होते.तिथे तिला देण्यात आली होती. त्यानंतर तिला पुनालूर तालुका रुग्णालयात नेऊन अतिरिक्त औषधोपचार आणि लशीच्या मात्रा देण्यात आल्या होत्या. मात्र काही दिवसांनंतर अचानक चावा घेतलेल्या ठिकाणी तिला गंभीर वेदना सुरू झाल्या, तसेच ताप आला. त्यामुळे पालकांनी तिला घेऊन पुन्हा रुग्णालयात धाव घेतली.एसएटी रुग्णालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याने थेट शिरेवर चावा घेतला, तर विषाणू थेट मेंदूपर्यंत पोहोचू शकतो आणि अशा परिस्थितीत लसीकरण किती प्रभावी ठरू शकेल हे सांगणे अशक्य असते.लागोपाठ दुसऱ्या मुलीचा बळी काही दिवसांपूर्वीच केरळच्या मलप्पूरम जिल्ह्यातील एका सहा वर्षीय मुलीचा लसीकरणानंतरही रेबीजमुळे मृत्यू झाला होता. केरळमध्ये गुणवत्तेची खात्री केल्यानंतरच लशी दिल्या जातात, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.