कष्टाचा पगार मागितला, बियर बार मालकाने डोळा फोडून गुप्तांग ठेचलं, छ. संभाजीनगर हादरलं.

 सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे एका बियर बार मालकाने कामगाराला मारहाण करून त्याचा खून केला. अतुल पाडळे नावाच्या कामगाराने पगाराची मागणी केल्याने मालक मनीष जयस्वाल आणि मॅनेजर दिनेश परदेशी यांनी त्याला बेदम मारले. मारहाणीत अतुलचा डोळा फोडला आणि गुप्तांग ठेचून त्याचा खून केला. पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.बियर बारमध्ये काम करणाऱ्या कामगाराने एकत्रित पगार मागितल्याच्या रागातून मालकाने बेदम मारहाण केली.डोळाही फोडला अन् गुप्तांग ठेचून खून केला.ही खळबळजनक घटना सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी सिल्लोड पोलिसांना मधील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिअर बारचा मालक मनीष जयस्वाल, मॅनेजर दिनेश परदेशी दोघे रा. घाटनांद्रा असे आरोपींची नावे आहेत. तर अतुल प्रल्हाद पाडळे वय 21 राहणार वाकडी तालुका भोकरदन जिल्हा जालना असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की 30 एप्रिल रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास अतुलने बियर बार मालक मनीष जयस्वाल यांच्याकडे ठरलेल्या पगाराची एकत्रित रक्कम एकाच वेळी द्या अशी मागणी केली.कामगाराची पगाराची एकत्रित रक्कम मोठी असल्याने मालक मनीष जयस्वाल याला पैसे द्यायचं जीवावर आलं. पैशाची मागणी करूनही पैसे मिळत नव्हते.काही वेळाने दोघांमध्ये वाद झाला. मालक मनीष जयस्वाल, मॅनेजर दिनेश परदेसी या दोघांनी मिळून अतुल पाडळे याला बेदम मारहाण केली. मारहाणीत अतुलचा डोळा फोडला. एवढेच नाही तर अतुलचे गुप्तांग ठेचून खून केला.कामगार अतुलचा खून आपणच केला असा संशय पोलिसांना येऊ नये यासाठी मृतदेह संस्कार बियर बार मध्ये आढळल्याची माहिती आरोपींनी सिल्लोड पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. दरम्यान तांत्रिक तपासामध्ये बिअर बारचा मालक मनीष जयस्वाल, दिनेश परदेशी यांनीच खून केल्याचं उघडकीस आलं. याप्रकरणी दोघांविरुद्ध सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.