पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना घडली. खेळताना झालेल्या वादातून सोळा वर्षांच्या मुलाचा जीव गेला. पोलिसांनी सोहेब शेख नावाच्या आरोपीला अटक केली आहे. खेळताना संयम राखण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.पिंपरी – चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑफलाईन गेममध्ये खेळण्याच्या नादात वाद झाला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा यात नाहक बळी गेला आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.गणेश कुऱ्हाडे (वय १६) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून या प्रकरणी १९ वर्षीय सोहेब शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी ४ मे रोजी ही घटना पिंपरी – चिंचवडमध्ये उडकीस आली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशचा भाऊ कार्तिक आणि सोहेब एका मित्राच्या टेरेसवर कॅरम आणि नंतर ‘नवा व्यापार’ हा बोर्ड गेम खेळत होते. खेळादरम्यान कार्तिक आणि सोहेब यांच्यात वाद झाला. ज्यामुळे सोहेबने कार्तिकला मारहाण केली. खेळ अर्धवट सोडून सर्वजण घरी परतले.










