पाठलाग केला, घरात घुसला, नऊ वर्षांच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी अन्… पुण्यात संताप.

पुण्यात एका तरुणाने नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकंच नाही तर त्याने मुलीला जिवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे.नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करून तिला जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने पुण्यात संतापाची लाट उसळली आहे.राहुल राम कुमार (वय २१, रा. धनकवडी) असं गुन्हा दाखल झालेल्या नराधम आरोपीचं नाव असल्याची माहिती आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पुणे शहरातील सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी राहुल कुमार हा पुण्याच्या धनकवडी भागात राहतो. तर पीडित नऊ वर्षाची मुलगी देखील याच भागात राहण्यास आहे. आरोपी राहुलने तिचा पाठलाग केला. तसेच, मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत त्याने या नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच, याबद्दल कोणाला सांगितल्यास आरोपीने मुलीला जिवे मारण्याची धमकीही दिली, अशी माहिती आहे.याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी राहुल कुमार हा पुण्याच्या धनकवडी भागात राहतो. तर पीडित नऊ वर्षाची मुलगी देखील याच भागात राहण्यास आहे. आरोपी राहुलने तिचा पाठलाग केला. तसेच, मुलगी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत त्याने या नऊ वर्षांच्या मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच, याबद्दल कोणाला सांगितल्यास आरोपीने मुलीला जिवे मारण्याची धमकीही दिली, अशी माहिती आहे.कोंढव्यातही अशाच प्रकारची घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. साहील अन्वर शेख (रा. कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती आहे. शेखने बाथरूममध्ये नऊ वर्षीय मुलीसोबत अश्लील कृत्य केलं. तसेच तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.