रावेर वनपरिक्षेत्राच्या कारवाईत 573400रु.चा अवैध वृक्षतोडीतील मुद्देमाल मध्य प्रदेश वन विभागाच्या केला स्वाधीन.

दिनांक 05/05/2025 रोजी मा.वनपरिक्षेत्र अधिकारी,रावेर यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार रावेर ते चोरवड या रस्त्याला गस्त करीत असताना मौजे लोणी गावा लागत एक आईसर ट्रक नंबर-MH04CU5418 तसेच एक ट्रॅक नंबर – MH 19Z7862 दिसून आली त्याची तपासणी केली असता त्यात विनापरवाना पंचरास लाकड मिळून आले. दोन्ही वाहनात ऐकून 31 घ.मी. माल असून त्याची किंमत 43400 एवढी आहे.तसेच वाहनांची किंमत ऐकून 530000 इतकी आहे तरी सदर गुन्हा हा मध्य प्रदेश हद्दीत झाला असून या बाबत भ्रमणध्वनी ने मध्य प्रदेश वनविभागाच्या कर्मचारीयांना कळवण्यात आले.

या ठिकाणी मध्य प्रदेश कर्मचारी जागे वर बोलून सदर वाहने त्याच्या ताब्यात देऊन या गुन्हे बाबत पुढील कार्यवाही मध्ये प्रदेश कर्मचारी करतील सदरची कारवाई ही ,नीनू सोमराज  म. वनसंरक्षक धुळे(प्रा.) वनवृत्त धुळे, जमीर शेख म. उप वनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव आर .आर.सदगीर, म. विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे तसेच समाधान पाटील सहा.वन संरक्षक यावल वन विभाग जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई ही ,अरविंद धोबी वनपाल सहस्त्रलिंग,आयेशा पिंजारी वनरक्षक अहिरवाडी, सविता वाघ वनरक्षक पाडले (खु),जगदीश जगदाळे वनरक्षक जुनोना, सुभाष माळी वनमजूर, विनोद पाटील वाहन चालक यांनी केली. सदरच्या ट्रक व मुद्देमाल हा1) युनुस दाऊदी वनपाल , 2) आर.डी.काजळे वनरक्षक , 3) वीरेंद्र कुमार वनरक्षक ह्या मध्य प्रदेश वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.