राय यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, वाद निर्माण झाल्यानंतरही राय त्यांच्या विधानांवर ठाम राहिले.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची स्थिती असताना, उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये राय यांच्या हातात राफेल विमानाची प्रतिकृती असून, त्याला प्रतिकात्मक ‘लिंबू-मिरची’ लटकवण्यात आली आहे. लढाऊ विमानावरून ‘लिंबू-मिरची’ कधी काढली जाईल, अशी विचारणा राय यांनी केंद्र सरकारला केली आहे. या व्हिडिओवरून वाद निर्माण झाला.राय यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, वाद निर्माण झाल्यानंतरही राय त्यांच्या विधानांवर ठाम राहिले. ‘मी देशाला सत्य दाखवून दिले. संरक्षणमंत्री राजनाथसिंह राफेल घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांनी त्यावर लिंबू आणि मिरची बांधली होती. मी केवळ हे लिंबू आणि मिरची कधी काढणार आणि राफेल कधी काम करणार? दहशतवाद्यांवर कारवाई कधी करणार, एवढीच विचारणा केली आहे,’ असे ते म्हणाले.










