इन्स्टावर बहिणीचा फोटो का पाठवला? विचारायला गेलेल्या भावाची हत्या; उचललं अन् दगडावर आपटलं.

इन्स्टाग्रामवर घरातील पोरीचा फोटो का टाकला याचा जाब विचारायला गेलेल्या तरुणाला दगडावर उचलून आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अवघ्या पाच तासात पकडलं.बहिणीचा फोटो इन्स्टाग्रामवर का पाठवला याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या युवकाला दगडावर जोरात आपटून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील अंथुर्णे येथे ही भयंकर घटना घडली असून याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ ५ तासांमध्ये हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. या घटनेमध्ये आकाश मुशा चौगुले (वय – २२,रा.अंथुर्णे) याची हत्या करण्यात आली असून राजेश ऊर्फ तात्या सायबु पवार (वय – २१, रा. अंथुर्णे) याला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे.

राजेश पवार याने आकाश चौगुले याच्या मोबाईवर इन्स्टाग्रामवर त्याच्या बहिणीचा फोटो मेसेज द्वारे पाठवला होता. सदर मेसेजचा जाब विचारण्यासाठी आकाश चौगुले आणि त्याची आई शांतबाई चौगुले हे राजेश पवार याच्या घरी शनिवार (३ मे रोजी) रात्री साडेसात वाजता गेले होते. यावेळी फोटो पाठविल्याचा जाब विचारल्याच्या रागातून राजेश पवारने वाद घातला.राजेश पवार याने आकाश चौगुले याच्या मोबाईवर इन्स्टाग्रामवर त्याच्या बहिणीचा फोटो मेसेज द्वारे पाठवला होता. सदर मेसेजचा जाब विचारण्यासाठी आकाश चौगुले आणि त्याची आई शांतबाई चौगुले हे राजेश पवार याच्या घरी शनिवार (३ मे रोजी) रात्री साडेसात वाजता गेले होते. यावेळी फोटो पाठविल्याचा जाब विचारल्याच्या रागातून राजेश पवारने वाद घातला.वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांनी तात्काळ आरोपीला पकडण्यासाठी तीन पोलीस पथकं रवाना केली. पोलिसांनी कडबनवाडी गावच्या हद्दीमधील वनविभागाच्या क्षेत्रामध्ये लपून बसलेल्या पवार याला ताब्यात घेवून अटक केली. पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, सह पोलीस निरीक्षक विजय टेळकीकर, पोलीस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, दत्तात्रेय चांदणे, जगदीश चौधरी, विकास निर्मळ, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव यांनी केली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.