भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले तर पाकिस्तान नष्ट होईल. यामुळे पाकिस्तानला पाई-पाईसाठी संघर्ष करावा लागू शकतो, असा इशारा मूडीज रेटिंग्जने दिला आहे.नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर शत्रू देशांमधील संबंध अलीकडच्या पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर आणखी ताणले गेले आहे. परिस्थितीत अशी आहे की आता दोन्ही देश संभाव्य युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. भारत कधीही आपल्यावर हल्ला करू शकतं अशी भीती पाकिस्तानने व्यक्त केली आहे तर, मूडीज रेटिंग्जकडून एक अहवाल आला आहे ज्यामुळे पाकिस्तानची चिंता आणखी वाढू शकते.भारताशी युद्ध पाकिस्तानला परवडणार नाही… मूडीजने अलीकडेच जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला तर पाकिस्तानची प्रगती थांबू शकते. यामुळे पाकिस्तान सरकारच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या प्रयत्नांमध्येही अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणेज, पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी जास्त वेळ लागेल.










