राखी सावंतचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात ती शत्रू देश पाकिस्तानला पाठिंबा देत आहे.मुंबई- बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती तिच्या विचित्र विधानांनी लोकांचे लक्ष वेधून घेते. लोकांचे मनोरंजन करणारी राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट उसळली असताना राखीने भलतेच विधान केले आहे. तिचे ते विधान ऐकून भारतीयांचे रक्त उसळत असून तिला भारताबाहेर काढण्याची विनंती लोक करत आहेत.










