पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला अटक; १४ वर्षांपासून होता फरार.

माओवादी संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता असल्याच्या आरोपावरून प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ ‘लॅपटॉप’ याला पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चऱ्होली येथून अटक केली. पुण्यातील ताडीवाला रस्ता परिसरातील रहिवासी आणि बंदी असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचा सक्रिय कार्यकर्ता असल्याच्या आरोपावरून प्रशांत जालिंदर कांबळे उर्फ ‘लॅपटॉप’ याला पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) चऱ्होली येथून अटक केली. त्याला ठाणे एटीएसच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १३ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.ताडीवाल रोड वस्तीतील रहिवासी प्रशांत कांबळे कबीर कला मंचच्या संपर्कात आला. नोव्हेंबर २०१०मध्ये मुंबईला कामानिमित्त जातो असे सांगून, तो घरातून निघून गेला.

मात्र, परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबाने १८ जानेवारी २०११ रोजी बंडगार्डन पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. एटीएसने २०११ दरम्यान संशयित माओवादी अँजेलो सोनटक्के हिला ठाण्यातून अटक केली. तिचे पुण्यात सक्रिय असणारे साथीदार आणि कबीर कला मंचचे काही कलाकारही या गुन्ह्यात अटक करण्यात आले.पुण्यातून बेपत्ता झालेले प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे दोन तरुण गडचिरोलीच्या जंगलात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) संघटनेचे सक्रिय सदस्य झाल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले होते. त्यांनाही या गुन्ह्यात फरारी आरोपी दाखविण्यात आले. हे दोघे माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडेसोबत काम करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. ठाणे एटीएसच्या अंतर्गत कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी होता. तो गेल्या सहा-सात वर्षांपासून खोपोली येथे ओळख लपवून राहत होता. रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील मुलांना शिकवत होता. तो पुण्यातील चऱ्होली परिसरात आल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.‘लॅपटॉप’ नावाने प्रसिद्धकांबळे याचे कम्प्युटर दुरुस्ती कौशल्य होते. तो माओवादी चळवळीत सक्रिय झाल्यानंतर त्याच्या या कौशल्यामुळे त्याला ‘लॅपटॉप’ हे नाव देण्यात आले होते. त्याला सर्व जण ‘लॅपटॉप’ नावाने ओळखत होते. कांबळे याच्याबरोबर बेपत्ता झालेला संतोष शेलार याला आजारी अवस्थेत जानेवारी २०२४मध्ये पुण्यात एटीएसने अटक केली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.