दारुचया नशेत एका बापाने आपल्याच मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.माजलगाव शहराजवळील खानापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दारूच्या नशेत असलेल्या बापाने आपल्याच मुलाची हत्या केली आहे. लाकडी दांड्याने डोक्यात मारून या बापाने आपल्या मुलाची हत्या केली आहे. ही भयंकर घटना रविवारी (४ मे) सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याची माहिती आहे. रोहित गोपाळ कांबळे (वय अंदाजे २५) असे मृत युवकाचे नाव असून, गोपाळ विठ्ठल कांबळे असे संशयित आरोपी बापाचे नाव असल्याची माहिती आहे.










