जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला झाला. त्यानंतर सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली. नदीच्या किनारी एका तरुणाचा मृतदेह आढळला. सुरक्षा दलाच्या कारवाई दरम्यान तो पळून गेला आणि नदीत बुडून त्याचा मृत्यू झाला, असा आरोप आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण तापले आहे.जम्मू – काश्मीरमधीव पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई सुरू आहे. यादरम्यान नदी किनारी एका तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाचा मृतदेह आढळल्यानंतर सुरक्षा दलावर गंभीर आरोप केले जात आहेत, कारण पहलगाम हल्ल्यानंतर त्या तरुणाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याचा मृतदेह आढळल्याने याची चर्चा सुरू आहे.या घटनेप्रकरणी एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओत असं दिसतंय, की तरुण स्वत: सुरक्षा दलापासून वाचवण्यासाठी पळतो आहे. त्यावेळी तो नदीत उडी मारतो आणि नदीतून वाहून जातो. या तरुणावर दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा आणि मदत करण्याचा आरोप होता.










