काश्मीरमधील हल्ल्यावरून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. मोदी प्रचारसभांमध्ये व्यस्त असल्याचा आरोप त्यांनी केला. युद्धाच्या चर्चेदरम्यान मोदी अदानींसोबत दिसल्याने राऊत यांनी दुजाभाव दर्शवला. गृहमंत्र्यांच्या ‘घरात घुसून मारू’ या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. शहांच्या राजीनाम्याची मागणी राऊत यांनी केली. सरकारने ठोस पाऊल उचलावे, असेही ते म्हणाले.काश्मीरच्या पेहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवर हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये घडलेल्या भीषण हत्याकांडानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र प्रचारसभांमध्ये रमले आहेत,” अशी तीव्र टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली.“देशात युद्धाची चर्चा सुरु आहे, पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली जात आहे, पण मोदी सरकारच्या कृतीत मात्र गांभीर्याचा अभाव दिसतो. एकीकडे राष्ट्रीय मीडिया युद्धाचे ढोल वाजवत आहे, तर दुसरीकडे मोदी सेलिब्रिटींसोबत मुंबईत उपस्थित राहतात.










