अनिकेत अंकुश कानगुडे मागच्या दोन वर्षापासून लातूरच्या RCC कोचिंग क्लासेस येथे तयारी करत होता. दरम्यान मागच्या वेळी अनिकेत कानगुडे या विद्यार्थ्याला 520 च्या जवळपास मार्क मिळाले मात्र वैद्यकीय प्रवेश मिळाला नाही.लातूर जिल्ह्यात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही जास्त आहे. राज्यस्थान मधील कोट्यानंतर महाराष्ट्रातील लातूरमध्ये सर्वात जास्त डॉक्टर व इंजिनियर्स होण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने अनेक विद्यार्थी चुकीचे पाऊल उचलतात. असाच काहीसा प्रकार आज (३ मे) समोर आला आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा उद्या होणार आहे. मात्र लातूरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या वीस वर्षीय विद्यार्थ्याने रूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना घडली आहे.










