या घटनेला कोणालाही जबाबदार धरू नये, असे लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली आहे.भिवंडी: पती रात्रपाळीसाठी कामावर गेलेला असताना घरी असलेल्या पत्नीने आपल्या तीन मुलींसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना भिवंडी शहरातील फेणे गाव इथं घडली असून आज सकाळी पती कामावरून घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला.मिळालेल्या माहितीनुसार, फेणे गाव येथील एका चाळीत लालजी बनवारीलाला भारती हा यंत्रमाग कामगार पत्नी पुनिता (वय 32) व मुली नंदिनी (वय 12),नेहा (वय 07) व अनु (वय 04) यांसोबत राहत होता. लालजी शुक्रवारी रात्रपाळीसाठी कामावर गेला होता.










