भांडणादरम्यान मोहम्मद शाहिद कुरेशीने त्याची पत्नी फरहीन हिचा गळा दाबून खून केला. खून करताना प्रचंड संतापात असलेल्या कुरेशीने फरहीनचे कपडे काढले आणि नंतर तिचा नग्न मृतदेह एका पोत्यात भरलाजयपूर: घरगुती भांडणाला कंटाळून जयपूरमध्ये एका पतीने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. हत्येनंतर मृतदेह एका पोत्यात भरून आरोपीने ते पोते खड्ड्यात फेकून दिले. आणि तो खड्डा झाकण्यासाठी त्यावर रद्दी फेकली. हत्येच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांना घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत हे प्रकरण उघड केले आणि आरोपी पतीला अटक केली. चौकशीदरम्यान पतीने धक्कादायक खुलासा केला.जयपूर शहरातील विश्वकर्मा परिसरात ही हत्येची भयंकर घटना घडली. यूपीच्या मेरठ येथील रहिवासी असलेला मोहम्मद शाहिद कुरेशी, हरिजन बस्ती शास्त्री नगर येथे राहतो.










