लाडकी बहिण योजनेच्या निधीवरून मंत्री नाराज आहेत. अनेक मंत्र्यांनी निधी कपात केल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थ खात्यावर थेट निशाणा साधला आहे. अर्थ खात्यातील काही ‘महाभाग’ कायद्याचे उल्लंघन करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निधी कपात करणे अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.लाडकी बहिण योजनेवरून आता मंत्र्यांनी थेट नाराजी बोलून दाखायला सुरूवात केली आहे. शिंद गटाचे नेते आणि तीन मंत्र्यांनी निधी कट करण्यावर भाष्य केले आहे. अशातच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट अर्थ खात्यावर निशाणा साधला आहे.तुमच्या माध्यमातून मला कळले की माझे खात्याचे पैसे वर्ग करण्यात आले.










