बॉन्डेज शरीरसंबंधावेळी बायकोचा मृत्यू, जिम ट्रेनरचा दावा; PM रिपोर्टनं केस फिरली, गूढ उकललं.

पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली ३४ वर्षीय जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. बॉन्डेज सेक्स करत असताना पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा जिम ट्रेनरनं केला होता. पण पोलीस तपासात त्याचा दावा खोटा आढळून आला.चेन्नई: पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली ३४ वर्षीय जिम ट्रेनरला अटक करण्यात आली आहे. बॉन्डेज सेक्स करत असताना पत्नीचा मृत्यू झाल्याचा दावा जिम ट्रेनरनं केला होता. पण पोलीस तपासात त्याचा दावा खोटा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी जिम ट्रेनरला बेड्या ठोकल्या. भास्कर असं जिम ट्रेनरचं नाव आहे. तो ४ जिम चालवतो. तर त्याची पत्नी शशिकलादेखील महिलांसाठी एक जिम चालवायची. जोडप्याला ४ आणि २ वर्षांची मुलंदेखील आहेत.पोलिसांनी भास्करला पत्नीच्या अटकेच्या आरोपाखाली तामिळनाडूच्या होसूर जिल्ह्यातून अटक केली. भास्कर आणि शशिकला यांचा प्रेम विवाह होता. २०१८ मध्ये ते लग्न बंधनात अडकले. बंगळुरुत प्ले स्कूल चालवत असताना शशिकला भास्करच्या प्रेमात पडली होती.

भास्करचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय शशिकलाला होता. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. ३० एप्रिलला भास्करनं शशिकलाला एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. शशिकलाच्या नाकातून अचानक रक्तस्राव सुरु झाला आणि शरीरसंबंधावेळी ती बेशुद्ध पडली, असं भास्करनं डॉक्टरांना सांगितलं.डॉक्टरांनी शशिकलाला मृत घोषित केलं. रुग्णालयानं याबद्दलची माहिती सिपटोक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांना शशिकलाच्या गळ्याजवळ खुणा दिसल्या. शशिकलाचा मृत्यू गळा दाबल्यानं झाला असावा असा संशय त्यांना आला. त्यांनी शशिकलाचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला.पोलिसांना भास्करबद्दल शंका आल्यानं त्यांनी चौकशी सुरु केली. शशिकला दारु प्यायली होती. त्यानंतर आम्ही बॉन्डेज सेक्स केला. त्यावेळी तिचा मृत्यू झाल्याचं भास्करनं पोलिसांना सांगितलं. पण शवविच्छेदन अहवालानं भास्करचं बिंग फुटलं. शशिकलाचा मृत्यू हा पूर्वनियोजित खून असल्याचं शवविच्छेदनातून स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांना भास्करला बेड्या ठोकल्या.भास्करनं १४ लाख रुपये हुंडा घेतला होता. त्यानंतरही तो शशिकलाशी वाद घालायचा, भांडायचा, असा दावा शशिकलाचे वडील अरुल यांनी केला. ‘दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. त्यानं हात, पाय बांधून तिची हत्या केली. मग तिला रुग्णालयात नेलं. तिथून त्यानं मला फोन केला आणि तुझी लेक दगावली आहे, असं सांगितलं. तो तिला मारहाण करायचा. आम्ही तिला याआधीही दोनदा रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी आम्ही पोलीस तक्रारदेखील दाखल केली होती,’ असं अरुल यांनी सांगितलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.