गोव्यातील लैराई देवीच्या यात्रेत चेंगराचेंगरी, भीषण दुर्घटनेत ७ मृत्यू, ३० जखमी.

गोव्यात शिरगाव येथे श्री लैराई देवी यात्रेत मोठी दुर्घटना घडली. यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन सात लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. रात्री उशिरा पहाटे ३ वाजता ही दुर्दैवी घटना घडली.गोव्यामध्ये लैराई देवीच्या यात्रेमध्ये भीषण घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गोव्यातील शिरगाव येथे दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३० हून अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती आहे. पहाटे ३ वाजता ही घटना घडल्याची माहिती आहे.गोव्यात देवीच्या या यात्रेदरम्यान आग लागल्याची अफवा परसली आणि लोक इथे-तिथे पळू लागले. त्यामुळे ही चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. यात्रेदरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणात होती.

त्यामुळे प्रशासनाकडून काही प्रमाणात नियोजन कमी पडून चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.जखमींना गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) आणि म्हापसा येथीलजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घटनेनंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात आहे.दरम्यान, गोव्यात शुक्रवारी जत्रा सुरू झाली आहे.

शिरगाव येथील श्री लैराई यात्रा ही गोव्यातील साजरा केला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा, वर्षातून एकदा येणारा उत्सव आहे. लैराई देवी ही देवी पार्वतीचं रूप मानलं जातं. या देवीच्या उत्सवासाठी हजारोंच्या संख्येने भाविक एकत्र येतात. या उत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे पारंपारिक धोंडाची जत्रा असते. या यात्रेत हजारो भाविक अनवाणी पायांनी जळत्या अंगारांवरुन चालतात.या उत्सवात देवीची भव्य मिरवणूक काढली जाते. मिरवणुकीत लयबद्ध ढोलकी वाजवणं, जप करत देवीचा जागर केला जातो. हजारो भाविक आणि पर्यटक देवीचा हा विधी पाहण्यासाठी आणि देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र येतात. लैराई देवीच्या यात्रेसाठी गोवा राज्यातून अनेक भाविक दर्शनासाठी येतात. तसंच परदेशातून अनेक भाविक गोव्यात या यात्रेसाठी दाखल होतात.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.