एका वर्षात 22 हजार अश्लील व्हिडिओ पाहिले, दत्ता गाडेची गुगल सर्च हिस्ट्री पाहून पोलिसही अवाक.

पुणे शहराला हादरवणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याने वर्षभरात २२ हजार वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आरोपीने पीडितेला खोटे बोलून बसमध्ये प्रवेश करण्यास सांगून तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी न्यायालयात आरोपीच्या जामिनाला विरोध केला असून, जामीन मिळाल्यास तो पीडिता आणि साक्षीदारांना धमकावू शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे.पुणे हादरवून सोडणाऱ्याा स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेबाबत नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. आरोपी दत्तात्रय रगाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, ८९३ पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

त्यानंतर आरोपीने जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला पोलिसांनी विरोध केला असून, त्याची कारणमीमांसा करणारा अर्ज शुक्रवारी न्यायालयात सादर केला.स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडे याने गेल्या वर्षभरात तब्बल २२ हजार वेळा अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीची सायबर तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली. त्यात ही बाब समोर आली. दत्ता गाडेचा फोन तपासल्यावर उघड झालेल्या माहितीने त्याची मानसिकता किती खालच्या पातळीवर गेली हे लक्षात येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावरून लक्षात येते की महिलांकडे तो किती वाईट नजरेने पाहत असेल.

त्यामुळे आधी काही महिलांनी त्याच्यावर रस्त्यामध्ये अडवून गोड बोलून गाडीत बसवून आड मार्गी नेत अत्याचार करण्याच्या तक्रारी केल्या आहेत.आरोपीने पीडितेला खोटे सांगून बसमध्ये प्रवेश करण्यास सांगितले. त्या वेळी बसमध्ये कोणीही नसल्याने पीडिता खाली उतरत असताना, आरोपीने बसचे दोन्ही दरवाजे बंद करून जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. आरोपीच्या मोबाइल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून, तो वारंवार स्वारगेट एसटी आगारात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याला जामीन झाल्यास तो अशा प्रकारचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे करण्याची शक्यता आहे; तसेच पीडिता, साक्षीदारांना तो धमकावू शकतो. त्यामुळे त्याचा जामीन नाकारण्यात यावा, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली. या घटनेनंतर पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.