पदोन्नती नाकारणाऱ्यांना ‘शिक्षा’; ७५ पोलिस निरीक्षकांची प्रशासकीय कोंडी, महासंचालक कार्यालयाकडून यादी जाहीर.

महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांना २०२२-२३ आणि २०२३-२४ या कालावधीत उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त पदावर बढतीचे आदेश जारी करण्यात आले.एकदा जिल्हा, ठिकाण किंवा एखाद्या पोलिस ठाण्यात जम बसला की पोलिस अधिकाऱ्यांना ती खुर्ची सोडवत नाही. सरकारी नियमानुसार पदोन्नती आली तर काही ना काही कारणे सांगून अधिकारी पदोन्नती नाकारतात. मात्र, आता पदोन्नती नाकारून इतर अधिकाऱ्यांचे नुकसान करणाऱ्या या अधिकाऱ्यांची पंचाईत होणार आहे.सुमारे ७५ पोलिस निरीक्षकांची यादी महासंचालक कार्यालयाने जारी केली असून त्यांची पोस्टिंग साइड ब्रँचला करणे, बढतीच्या यादीत समावेश न करणे आणि इतकेच नाही तर त्यांना वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित ठेवा, असे आदेश पोलिस महासंचालक कार्यालयातून देण्यात आले आहेत.महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस निरीक्षकांना २०२२-२३ आणि २०२३-२४ या कालावधीत उपअधीक्षक, सहायक पोलिस आयुक्त पदावर बढतीचे आदेश जारी करण्यात आले.

पदोन्नती देण्यात आलेल्या निरीक्षकांपैकी ७५ निरीक्षकांनी पदोन्नती नाकारली. यासाठी या निरीक्षकांनी वेगवेगळी वैयक्तिक कारणे पुढे केली. काहींनी तर पदोन्नती टाळण्यासाठी जुन्या विभागीय चौकशीचा आधार घेतला. निरीक्षकांनी बढती घेण्यास टाळाटाळ केल्याचा फटका सेवाज्येष्ठतेमध्ये कनिष्ठ असलेल्या पोलिसांना बसला. याची गंभीर दखल पोलिस महासंचालक कार्यालयाने घेतली आहे.पदोन्नती नाकारणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी शासन निर्णयांचा दाखला देत त्यानुसार या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिस आयुक्त, अधीक्षक तसेच इतर घटकप्रमुखांना देण्यात आले आहेत. शासन निर्णयाप्रमाणे पदोन्नती टाळणाऱ्यांवर कारवाई न केल्यास त्याची जबाबदारी घटकप्रमुखांची असेल असेही बजावण्यात आले आहे.

निवड झाल्यानंतर अथवा तत्पूर्वी एखाद्या अधिकाऱ्याने पदोन्नतीचे पद नाकारल्यास त्याचे नाव पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निवडयादीतून नाव काढून टाकण्यात येणार.पदोन्नती नाकारलेल्या वर्षांपासून पुढील दोन वर्षे होणाऱ्या पदोन्नतीमध्ये त्यांच्या नावाचा विचार केला जाणार नाही.तिसऱ्या वर्षी या अधिकाऱ्याचा निवड यादीत समावेश करताना पात्रता तपासली जाणार.महत्त्वाच्या ठिकाणी या अधिकाऱ्यांची नेमणूक न करता साइड पोस्टिंग दिली जाणार.विभागीय पदोन्नती समितीने पात्र ठरविल्यानंतर या अधिकाऱ्याचा वेतन आयोगाच्या लाभासाठी विचार करण्यात येईल.पदोन्नतीचा कार्यभार स्वीकारल्याच्या दहा वर्षांच्या नियमित सेवेनंतर वेतन आयोगाच्या लाभास पात्र ठरतील

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.