तू चौकात जाऊन थांब ; दागिने बघून चालकाची नियत फिरली, साथीदाराला दिली टीप, पण पोलिसांच्या खबऱ्याने वाट लावली.

चालकाने टीप दिल्यानंतरच ही चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांकडून 15.12 लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.कर्मवीर चौकातील कर्मवीर पतसंस्थेतील लॉकरमध्ये 40 तोळे दागिने जमा करण्यासाठी गेल्यानंतर संस्थेच्या दारातूनच दागिन्यांची बॅग लंपास करणाऱ्या एकासह कार चालकाला बारा तासात अटक करण्यात आली आहे. चालकाने टीप दिल्यानंतरच ही चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दोघांकडून 15.12 लाखांचा ऐवज जप्त केल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.अमोल महेश माने (वय ३०, रा. शिवपार्वती कॉलनी, हरीपुर), कार चालक नितेश रामचंद्र गजगेश्वर (वय २९, रा. हरीपुर रोड, झाडातच्या मारुतीच्या मागे, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धनचंद्र सकळे (वय 87, रा. पत्रकार नगर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. सकळे यांच्या घरी लग्नकार्य असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी कर्मवीर पतसंस्थेतून दागिने काढले होते.

शुक्रवारी सकाळी ते दागिने लॉकरमध्ये ठेवण्यासाठी चालक नितेश गजगेश्वर याला घेऊन गेले होते. ते कारमधून उतरल्यावर दुचाकीवरून आलेल्या अमोल माने याने सकळे यांच्या हातातील दागिन्यांची बॅग लंपास केली होती.या घटनेनंतर खळबळ उडाली होती. विश्रामबागचे पोलीस निरीक्षक भालेराव यांनी तातडीने पथकांना सूचना देऊन चोरट्याला पकडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान पथकातील विशाल भिसे, संदीप साळुंखे, आर्यन देशिंगकर यांना ही चोरी हरिपूर येथील अमोल माने याने केल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यावर त्याने सकळे यांचा कार चालक नितेश गजगेश्वर याने दागिने ठेवण्यासाठी पतसंस्थेत जाणार असल्याची टीप दिली होती.

तसेच कर्मवीर चौकात आधीच जाऊन थांब आणि सकळे गाडीतून उतरल्यावर बॅग लंपास कर असे सांगितल्याची कबुली दिली. तसेच ते दागिने असलेली बॅग माने याच्या छोटा हत्ती गाडीत ठेवल्याचे सांगितले त्यानंतर चालक गजगेश्वर याला अटक करण्यात आली.या दोघांकडून दागिने, दुचाकी (एमएच-१० एएस-४९३५), छोटा हत्ती (एमएच-11 एजी ७१४९) असा 15.12 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक कविता नाईक, उपनिरीक्षक सुजाता भोपळे, विशाल भिसे, संदिप साळुंखे, बिरोबा नरळे, अमर मोहिते, प्रशांत माळी, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, महंमद मुलाणी, गणेश बामणे, उमेश कोळेकर, करण परदेशी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.