आमदार जानकरांच्या लेकाचं प्रसंगावधान, धूर दिसताच गाडी पंपाबाहेर नेली, स्कॉर्पिओ पेटली पण…

धूर निघत असतानाही जीवन जानकर यांनी आटोकाट प्रयत्न करत स्कॉर्पिओ गाडी पंपाच्या बाहेर आणली. गाडीला पंपावरच आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती.सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव तांडा येथील पंपावर पेट्रोल भीषण अपघात झाला. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस मतदारसंघातील आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाच्या स्कॉर्पिओ गाडीने अचानक पेट येतला. प्रसंगावधान राखून गाडी तातडीने पेट्रोल पंपाच्या बाहेर आणण्यात आली. मोठ्या चपळाईने जीवन जानकर गाडीतून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली.धूर निघत असतानाही जीवन जानकर यांनी आटोकाट प्रयत्न करत स्कॉर्पिओ गाडी पंपाच्या बाहेर आणली. गाडीला पंपावरच आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. अत्यंत ज्वलनशील असलेले पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्या जवळ होत्या, त्यामुळे जानकर यांनी अवघ्या काही सेकंदात गाडी पंपाच्या बाहेर काढली, त्यामुळे दुर्घटना टळली.आमदार पुत्र जीवन जानकर हे धानोरे गावचे माजी सरपंच आहेत.

या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र त्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.आमदार उत्तम जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर हे कामानिमित्त पासपोर्ट कार्यालयात आले होते. काम झाल्यानंतर ते परत माळशिरसला जात होते. सोलापूर शहरापासून चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव तांडा येथील पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी गाडी उभी केली. पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गाडी उभी करताच गाडीतून धूर निघत असल्याचे तेथील कर्मचाऱ्याच्या लक्षात आले.आमदारपुत्र जीवन जानकर यांना पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सांगितले गाडी पंपाबाहेर घेण्यात सांगितले.

जीवन जानकर यांनी तातडीने गाडी सुरू करून पंपाच्या बाहेर आणली. पंपातून बाहेर येताच गाडीने अचानक पेट घेतला. प्रसंगावधान राखून जीवन जानकर हे गाडीतून तातडीने उडी मारली.जीवन जानकर ते सुरक्षित आहेत. शुक्रवारी दुपारची वेळ असल्याने उष्णताही मोठ्या प्रमाणात होती, त्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. आगीचे लोटच्या लोट दूरपर्यंत दिसत होते. महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला तातडीने पाचारण करण्यात आले. तोपर्यंत गाडी बऱ्यापैकी जळून खाक झाली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.