विमान प्रवासात बॅगेतून दीड लाख चोरीला, विमानतळ प्रशासनाने जबाबदारी ढकलली; प्रवाशाला मनस्ताप, दाद कोणाकडे मागणार.

पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतील दीड लाख रुपये चोरीला गेले. या घटनेनंतर विमानतळ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, कारण यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. विमान कंपन्या जबाबदारी टाळत असल्याने प्रवाशांनी दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीच्या सामानामधील पावणेदोन लाख रुपये चोरीला गेल्याची घटना घडली होती. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. त्यामध्ये जबाबदारी कोणाची, असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांकडे तक्रार द्या, असे सांगून विमान कंपन्या जबाबदारी ढकलतात. विमानतळ प्रशासन हे प्रकार गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे प्रवाशांनी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठोस कारवाई होत नसल्यामुळे, असे प्रकार वारंवार घडत असून, विमानतळ प्रशासनाने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.दुबईहून पुण्याला स्पाइट जेट कंपनीच्या विमानातून येणाऱ्या एका व्यावसायिकाच्या सामानामधून दीड लाखांची रोकड चोरल्याचा प्रकार पुणे विमानतळावर उघडकीस आला. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वीदेखील सामान चोरीला गेल्याचा प्रकार घडला असून, त्याचा अद्याप तपास झालेला नाहीयाबाबत सुयोग बाळकृष्ण सपकाळ (वय ४५, रा. पिंपरी) यांनी तक्रार दिली आहे. सपकाळ हे पर्यटन व्यावसायिक आहेत. त्यांनी या घटनेविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘कामाच्या निमित्ताने २८ एप्रिलला दुबई येथे गेलो होते. काम संपवून स्पाइट जेट कंपनीच्या विमानाने गुरुवारी मध्यरात्री पुण्यासाठी निघालो. त्या वेळी माझी लॉक असलेली बॅग विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे दिली. त्यामध्ये दीड लाख रुपयांची रोकड होती. पुणे विमानतळावर पहाटे सव्वाचार वाजता उतरलो. इमिग्रेशनची प्रक्रिया पार करून सामान घेण्यासाठी गेलो. बॅग घेतली असता तिचे लॉक तुटलेले दिसले. त्याबाबत इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

त्या वेळी त्यांनी स्पाइस जेटच्या अधिकाऱ्यांना कळविण्यास सांगितले. दोन कर्मचारी आले असता त्यांना सर्व प्रकार सांगून कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यास सांगितले; पण त्यांनी तुम्ही पोलिसांकडे तक्रार करा अशी सूचना केली.’विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य न मिळाल्याने सपकाळ यांनी १०० क्रमांकावर फोन केला. त्यानुसार दोन पोलिस विमानतळाच्या टर्मिनलबाहेर आले. तेथूनच सपकाळ यांना फोन करू लागले. सपकाळ यांनी त्यांना आत येण्यास सांगितले; पण त्यांनी टर्मिनलच्या आतमध्ये येण्यास बंदी असल्याचे सांगितले.एसटी बस, रेल्वेत, बॅगांमधील पैसे, मौल्यवान ऐवज चोरीला जात असल्याचे आतापर्यंत ऐकले होते; पण हजारो रुपयांचे तिकीट काढून देखील सामान सुरक्षित राहणार नसेल, तर अवघड आहे. याबाबत दुबई सरकारलादेखील ई-मेल करणार आहे. या सर्व प्रकारामध्ये खूपच मनस्ताप झाला, असं प्रवासी, सुयोग सपकाळ यांनी सांगितलं.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.