मोकाट कुत्र्याचा हल्ला, सात वर्षांच्या चिमुकल्याचा जबडा फाडला; डोक्यावरुन मायेने हात फिरवण पडलं महागात.

पुण्यात एका सात वर्षांच्या मुलावर कुत्र्याने हल्ला केला. मुलाला कुत्र्याने फरफटत नेऊन त्याच्या गालाला चावा घेतला. मित्रांनी दगड मारल्याने तो वाचला. त्याला रुग्णालयात दाखल केले. नागरिकांनी मुलाच्या मदतीसाठी पैसे जमा केले. उद्यानातील सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.पुण्यातील शिवाजीनगर भागात असलेल्या ‘चित्तरंजन वाटिका’ या महापालिकेच्या उद्यानात खेळण्यासाठी आलेल्या एका चिमुड्यावर कुत्र्याने हल्ला केला. कुत्र्याने पंधरा ते वीस फूट फरफटत नेऊन त्याच्या गालाचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र त्याच्या मित्रांनी त्या कुत्र्याला दगड मारल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.नरेंद्र शेर बहादूर बिस्ता (वय ७) असं गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्याचं नाव आहे. चिमुकल्याने कुत्र्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला, पण कुत्र्याने त्याचा लचका तोडला. मात्र स्थानिक नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्या गालावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरातील मॉडेल कॉलनी परिसरात महापालिकेचे ‘चित्तरंजन वाटिका’ उद्यान आहे.

या उद्यानात नरेंद्र हा त्याच्या मित्रांसोबत खेळण्यासाठी आला होता. मात्र त्यावेळी उद्यानात भेटके कुत्र देखील होते. या भटक्या कुत्र्याच्या डोक्यावरून त्याने मायेने हात फिरवला मात्र त्या कुत्र्याने नरेंद्रला १५ ते २० फूट फरफटत नेलं आणि त्याच्या गालाचा लचका तोडला. मात्र वेळीच नरेंद्रच्या मित्राने कुत्र्याला दगड मारल्याने सुदैवाने त्याची सुटका झाली. मात्र, कुत्र्याने मुलाचा जबडा फाडल्याने मोठी जखम चिमुकलीला झाली होती.त्याला तात्काळ उपचारासाठी ससून रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे चिमुकल्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, गालाची शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. मुलाच्या पालकांनी सामाजिक कार्यकर्ते रविद्र साळेगावकर यांच्या माध्यमातून आमदार सिध्दार्थ शिरोळे यांच्याशी संपर्क केला.

शिरोळे यांनी दिनानाथ रूग्णालयचे प्रशासक सचिन व्यवहारे यांच्याशी संपर्क करून मुलावर उपचार करण्याच्या सूचना दिल्या. धर्मादाय योजनेतून डॅा. कौस्तुभ प्रभूणे यांनी प्लास्टिक सर्जरी यशस्वीरित्या पार पाडली.यावेळी उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांनी मुलाच्या उपचासाठी जवळपास पंचवीस हजार रूपये वर्गणी गोळा करून औषधोपचासाठी देण्यात आले. या घटनेतून मुलगा थोडक्यात वाचला असून उद्यानात सुरक्षा रक्षकाचं काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.