घरात लपवून रजिस्टर्ड मॅरेज, ५ वर्षांनी तरुणीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार; पुण्यात पोलिस उपनिरीक्षक पतीवर गुन्हा.

पुण्यात एका पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एका तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने विवाह केला. नंतर पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. जात आणि गर्भपाताच्या नावाखाली फसवणूक केली. तरुणीने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.कुटुंबीयांना अंधारात ठेवून प्रेमसंबंध असलेल्या तरुणीसोबत नोंदणी पद्धतीने विवाह करून, काही काळाने तरुणीचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास नकार देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणी अनुसूचित जातीची असल्याने त्याने नकार दिला; तसेच तरुणीला गर्भपात करण्यास भाग पाडले आणि तरुणीकडून दहा ते १२ लाख रुपये घेऊन परत केलेले नाहीत, असे तक्रारीत नमूद आहे.या प्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फलटण येथील गोखली गावातील ३२ वर्षीय तरुणासह त्याचा भाऊ आणि वडील यांच्यावर या प्रकरणी अट्रॉसिटी कायद्यांसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार ३० सप्टेंबर २०२० ते २०२५ या काळात झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण नुकताच पोलिस उपनिरीक्षक झाला आहे. तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. त्या वेळी त्याची आणि तक्रारदार तरुणीची ओळख झाली होती. ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. आरोपीने तरुणीशी नोंदणी पद्धतीने लग्न केले. मात्र, त्याबद्दल त्याने कुटुंबीय आणि मित्र परिवारात सांगितले नाही; तसेच तिला समाजात पत्नी म्हणून ओळख दिली नाही. लग्नाबद्दल घरी सांगतो,’ असा विश्वास दाखवून त्याने तरुणीकडून वेळोवेळी १० ते १२ लाख रुपये घेतले. तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. त्यातून ती गर्भवती राहिली.

तेव्हा आरोपीने जबरदस्तीने तिला गर्भपात करायला लावला.आरोपीची उपनिरीक्षकपदी निवड झाल्यावर तरुणीने लग्नाबाबत कुटुंबीयांना सांगण्याची विनंती केली. तेव्हा आरोपीने टाळाटाळ केली. ‘घरचे माझ्यासाठी स्थळ पाहत आहेत. तुझ्या जातीमुळे माझ्या घरचे तुझा स्वीकार करणार नाहीत. त्यांना आपले लग्न मान्य होणार नाही. तू माझा विचार विचार सोडून दे, असे म्हणत आरोपी तक्रारदार तरुणीपासून दूर राहू लागला. यानंतर तरुणीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.