अजित पवारांचा प्रयत्न फसला; छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीत उभे ठाकले महायुतीचेच शिलेदार.

भाजप नेते तानाजी थोरात यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या भूमिकेविरोधात जात निवडणूक लढणार असल्याचे सांगितले. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार, अशी चर्चा अनेक दिवस रंगली होती. यासाठी खुद्द अजित पवार आणि राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतोनात प्रयत्नही केले होते. परंतु हे प्रयत्न फोल ठरले असून अजित पवारांच्या पॅनलविरोधात महायुतीचे शिलेदार उभे ठाकल्याचे दिसून येत आहे.श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मागील निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्याविरोधात असलेले राज्य साखर संघाचे साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना अजित पवारांनी यंदा ऐनवेळी विश्वासात घेत निवडणुकीची संपूर्ण धुरा जाचक यांच्यावर सोपवली आणि निवडणूक बिनविरोध करण्याबाबतचे आवाहन केले होते.

दरम्यान त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवून याबाबतची भूमिका जाहीर केली होती. मात्र या बैठकीला भाजपचे अनेक जण गैरहजर राहिल्याचे दिसून आले. अजित पवारांच्या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी भाजप नेते तानाजी थोरात यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या भूमिकेविरोधात जात निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते.छत्रपती सहकारी कारखान्याच्या २१ जागांसाठी तब्बल ६०० हून अधिक जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यानंतर अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखतीला ४०० हून अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यानंतर शुक्रवारी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे व ज्येष्ठ नेते किरण गुजर यांनी पत्रकार परिषद घेत

‘श्री जय भवानी माता’ पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. तर दुसरीकडे, भाजप नेते तानाजी थोरात यांनी श्री छत्रपती कारखाना बचाव पॅनलच्या माध्यमातून अजित पवार यांच्यापुढे आव्हान उभे केलं आहे.
दरम्यान, ‘श्री जय भवानी माता’ या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ ५ एप्रिलला केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक यांच्या उपस्थितीत या पॅनलच्या प्रचाराची सुरुवात होणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.