पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेगळे वळण, एनआयएला मोठा संशय, २००० खेचर चालकांची चाैकशी.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या तपासात एनआयएला (NIA) संशय खेचर चालकांवर आहे. हल्लेखोरांना त्यांनी मदत केली असावी, असा संशय आहे. सुमारे दोन हजार खेचर चालकांची चौकशी झाली आहे. दहशतवादी कोणत्या मार्गाने आले, याचा तपास सुरू आहे.पहलगाम : जम्मू काश्मीरच्या पहलगामवर झालेल्या हल्ल्यानंतर देशात संतापाचे वातावरण बघायला मिळाले. बैसरन व्हॅलीमध्ये २७ हिंदू पर्यटकांना टार्गेट करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच अमित शहा यांनी जम्मू काश्मीरकडे धाव घेतली. हे दहशतवादी पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट झाल्यावर भारताने आक्रमक भूमिका घेतली. लष्कराकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय. पाकिस्तान विरोधात भारताने कडक भूमिका घेतलीये. पाकिस्तानचे अनेक मंत्री भडकावू विधाने देखील करत आहेत.

22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास (राष्ट्रीय तपास संस्था) एनआयएकडे आहे. या हल्लाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न एनआयएकडून केला जातोय. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात स्थानिक पोनी रायडर म्हणजे खेचर चालवणाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. तपासात हे स्पष्ट झाले आहे की, दहशतवादी हे काही दिवसांपासून पहलगाममध्ये रेकी करत होते.बैसरन व्हॅलीची पाहणी त्यांनी अगोदरच केली. हल्लेखोरांना ये-जा करण्यासाठी काही खेचर चालकांनी मदत केली असावी, असा तपास यंत्रणांना संशय आहे. पहलगाम हल्ल्याच्या तपासासाठी एनआयएने आतापर्यंत जवळपास १५०० ते २००० खेचर चालकांची चौकशी केली आहे. दहशतवाद्यांनी कोणता मार्ग वापरला आणि दुर्गम डोंगराळ भागातून त्यांनी प्रवेश कसा केला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न एनआयए करत आहे.त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी हल्ला झाला, तेव्हा पहलगामच्या एंट्री आणि एग्जिट पॉईंटवर अनेक खेचर चालक होते. गेल्या आठ दिवसांपासून खेचर चालकांची चौकशी सुरू आहे. पहलगामच्या आसपास असे कोणते एग्जिट पॉईंट्स आहेत, जे दुर्गम आहेत आणि ज्यांच्यामधून दहशतवादी घुसखोरी करू शकतात, हे शोधण्यावर तपास यंत्रणांचा प्रयत्न आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान काही पोनी रायडर्सची (खेचर चालकांची) विधानं जुळत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय वाढला आहे. तपास यंत्रणांनी काही संशयित रायडर्सना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे. काही खेचर चालकांच्या हालचालीवर यंत्रणांचे बारीक लक्ष आहे. त्यांचा मोबाइल डेटा देखील तपासला जातोय. हेच नाही तर काही खेचर चालकांवर तपास यंत्रणांना संशय आहे. कारण ते सतत विधाने बदलताना दिसत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.