अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घेऊन तुळजापूरला निघाले, वाटेत कुटुंबावर काळाचा घाला; पुण्यातील एकाचा मृत्यू, चार जखमी.

 बारामतीहून तुळजापूरला निघालेल्या कुटुंबाला अक्कलकोट येथे अपघात झाला. कंटेनर आणि दोन कारच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर लहान मुलांसह चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून उपचार सुरू आहेत. देवदर्शनासाठी सकाळी बारामतीमधून निघालेल्या कुटुंबाने अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं. त्यानंतर मॅपवरून दाखवलेल्या रस्त्याप्रमाणे तुळजापूरकडे निघालेल्या कुटुंबाचा अक्कलकोट तालुक्यातील चपळगावजवळ अपघात झाला आहे. कंटेनर आणि दोन कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जागीच ठार, तर चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी दुपारी घडला.अक्कलकोटहून तुळजापूरला निघालेल्या चारचाकी गाडी क्र. एम एच १२ डब्ल्यू १२३० ला कंटेनरने समोरून ठोकलं. यामध्ये चारुशीला अमोल रासकर (वय ३६, रा. मांजरी, ता. हवेली, जि. पुणे) यांचा जागीच मृत्यू झाला. ठोकलेल्या गाडीनंतर तात्काळ कंटेनर आणखी एका दुसऱ्या चारचाकी गाडीवर जाऊन आदळला.

यामध्ये गाडी क्र. एमएच १३ सीयू ५१२८ ही गाडी अक्षरशः चक्काचूर झाली. या अपघातात छाया विठ्ठल गुलदगड (वय ६२, रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती), अमोल विजय रासकर (वय ३६), प्रथमेश अमोल रासकर (वय १०), चंद्रमा अभिजित रासकर (वय ३४), हृदया अभिजित रासकर (वय ३, सर्व रा. मांजरी, जि. पुणे) हे सर्वजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने सोलापूरमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहेत.अक्कलकोटवरुन तुळजापूरकडे जाताना अपघातात जखमी झालेली हृदया ही तीन वर्षाची चिमुकली जेवणासाठी गाडीतील सर्वांना आग्रह करत होती. हा आग्रह सुरू असतानाच मृत झालेली काकू आणि आई गाडी थांबवण्यासाठी विनंती करत होते, त्यावेळी हा अपघात झाला.

कंटेनर आणि दोन कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक जागीच ठार, तर चार जण जखमी झाले आहेत.माल वाहतूक कंटेनर क्र. एम एच १३ सीयु ५१२८ ही गाडी हन्नुरहून अक्कलकोटच्या दिशेने निघाले होते. या गाडीचा ड्रायव्हर ऋषिकेश दत्तात्रय पुरी (वय २२, रा. अरळी खुर्द, ता. तुळजापूर) याचा गाडीवरील ताबा सुटलेला असतानाच अक्कलकोटहून तुळजापूरला निघालेल्या चारचाकी गाडी क्र. एम एच १२ डब्ल्यू १२३० ला कंटेनरने समोरून ठोकलं.ठोकलेल्या गाडीनंतर तात्काळ कंटेनर दुसऱ्या चारचाकी गाडीवर जाऊन आदळला. यामध्ये गाडी क्र. एमएच १३ सीयू ५१२८ ही गाडी अक्षरशः चक्काचूर झाली. या विचित्र अपघातात एक जण ठार, तर पुण्यातील तीन भाविक गंभीर जखमी झाले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.