तीन-चार मिनिटातच गोळीबाराचा आवाज आला, आम्ही मागे पाहिलं, तर लोकं पळताना दिसली, त्यामुळे आम्हीही धावत सुटलो.” असं सुबोध पाटील सांगत होते.नवी मुंबई : जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले नवी मुंबईमधील खारघर येथील सुबोध पाटील सुखरुप घरी परत आले आहेत. त्यांच्या मानेला गोळी चाटून गेल्यामुळे मिलिट्री रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोण कोण हिंदू आहेत, असं विचारुन आम्हाला बाजूला केलं. भारतीय लष्कर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत झाल्याचं पाटील यांनी सांगितलं.नवी मुंबईतील खारघर येथे राहणारे सुबोध पाटील हे निसर्ग पर्यटन कंपनीसोबत सपत्नीक जम्मू काश्मीर टूरवर गेले होते. “आम्ही दुपारी साडेबारा वाजता पहलगामला पोहोचलो. घोड्यावर बसून आम्ही वरती गेलो. एक फोटोवाला आमच्या जवळ आला, त्याने काश्मिरी पेहरावात फोटो काढायचंय का विचारलं, आम्ही तयार झालो, तीन-चार मिनिटातच गोळीबाराचा आवाज आला, आम्ही मागे पाहिलं, तर लोकं पळताना दिसली, त्यामुळे आम्हीही धावत सुटलो.” असं सुबोध पाटील सांगत होते.










