सोड ना तुझ्या बायकोला, डॉक्टर प्रेयसीचा दबाव, विवाहित प्रियकराने टोक गाठलं, सात वर्षांची प्रेम कहाणी अधुरी.

​​भावना आणि उदेश यांच्यात प्रेमसंबंध होते. भावना त्याला पत्नीला घटस्फोट देण्यास सांगत होती. या कारणाामुळे उदेशने तिला जाळले. ही घटना 2 मे 2025 रोजी उघडकीस आली.एका क्लर्कने आपल्या डॉक्टर प्रेयसीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना हरियाणातील हिसारमध्ये घडली आहे. आरोपीचे नाव उदेश यादव असून तो विवाहित आहे. मयत डॉ. भावना यादव त्याच्यावर पहिल्या पत्नीला सोडून आपल्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती, त्यामुळे आपण तिची हत्या केल्याचं उदेशने म्हटलं आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.भावना आणि उदेश यांच्यात प्रेमसंबंध होते. भावना त्याला पत्नीला घटस्फोट देण्यास सांगत होती. या कारणाामुळे उदेशने तिला जाळले. ही घटना 2 मे 2025 रोजी उघडकीस आली.राजस्थानमधील कोटपूतली-बहरोडमधील अनंतपुरा गावातील 25 वर्षीय डॉ. भावना यादव हिच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. रेवाडीचा रहिवासी असलेला उदेश यादव हा हरियाणा कृषी विद्यापीठात क्लर्क म्हणून काम करतो.

पोलीस तपासात असे समोर आले आहे की, डॉ. भावना आणि उदेश यांच्यात प्रेमसंबंध होते. भावनाने उदेशला त्याच्या पत्नीला घटस्फोट देण्यास सांगितले. त्यामुळे उदेश खूप वैतागला होता.24 एप्रिल रोजी लुदास रोडवरील किसान आश्रमाजवळ असलेल्या आपल्या क्वार्टरमध्ये त्याने भावनावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.आगीत भाजलेल्या भावनाला उदेशनेच शहरातील सोनी बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि तेथून तो पळून गेला. या घटनेनंतर, भावनाच्या कुटुंबीयांनी तिला जयपूरला नेले. SMS हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.राजस्थान पोलिसांनी भावनाची आई गायत्री देवी यांच्या तक्रारीवरून उदेश यादवविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. हिसार पोलिसांनी उदेशला ताब्यात घेतले. उदेशने पोलिसांना सांगितले की, 23 एप्रिल रोजी भावना दिल्लीहून हिसारला आली होती. हिसारमध्ये आल्यानंतर ती HAU मधील उदेशच्या क्वार्टरवर गेली. तेथे, संध्याकाळी आणि 24 एप्रिलच्या सकाळी, उदेशला घटस्फोट देण्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. त्यामुळे रागाच्या भरात उदेशने भावनावर पेट्रोल टाकून तिला आग लावली.उदेश आणि भावनाची पहिली भेट 2018 मध्ये एका लग्न समारंभात झाली होती. त्यावेळी त्यांची ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध सुरू झाले. भावना अनेकदा उदेशला भेटण्यासाठी हिसारला येत होती. दोघांमध्ये फोनवरही खूप बोलणे व्हायचे. भावना, उदेशवर सतत घटस्फोटासाठी दबाव टाकत होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.