मुलगा गेल्या दोन दिवसांपासून गावी राहणाऱ्या आई वडिलांना फोन करत होता पण प्रतिसाद मिळत नसेल्याने अखेर त्याने शेजाऱ्यांना घरी पाठवले. तेथे जाताच धक्कादायक घटना समोर आली.चैन्नई: गावात शेतातील एका घरात राहणाऱ्या दोन वयोवृद्ध दांम्पत्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. 75 वर्षीय रामासामी हे आपल्या पत्नी बक्कियाम्मल यांच्यासोबत राहत होते.तमिळनाडूच्या इरोडमध्ये हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शिवगिरीच्या जवळ वेलंगट्टू वलासु गावात हे दांम्पत्य राहत होते.रामासामी यांच्या मुलगा हा मुथुर येथे राहत होता. गेल्या दोन दिवसांपासून आई वडिलांशी संपर्क होत नसल्याने काळजीत होता. तो त्यांना वारंवार फोन करत होता. दरम्यान त्याने तेथे राहत असलेल्या शेजाऱ्यांशी संपर्क साधला आणि आई वडीलांबद्दल माहिती मिळवण्यास सांगितले.










