अवजड वाहनांची कोंडी फुटणार, घोडबंदरच्या गायमुख घाटाची दुरुस्ती मोहीम फत्ते; वाहन चालकांना दिलासा.

ठाण्याजवळील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्याच्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले. यामुळे घोडबंदरच्या दिशेने होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम २५ एप्रिलला सुरू झाले आणि ते काही दिवसांत पूर्ण झाले.आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने घोडबंदर रोडच्या गायमुख घाटातील रस्त्याची दरवर्षीप्रमाणे होणारी दुर्दशा टाळण्यासाठी यंदा दीड महिनाआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठाण्यावरून घोडबंदरच्या दिशेने घाटातील रस्ता दुरुस्तीचे (डांबरीकरण) काम गुरुवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्यामुळे घोडबंदरवर सुरू असलेली अवजड वाहनांची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.घाटातील उर्वरित कामाचे नियोजन येत्या आठवड्यात केले जाणार असून या काळात वाहतुकीला अडथळा होणार नाही, याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम रखडले आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर या घाट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते.मात्र पावसाळा सुरू होताच काही दिवसांत घाटातील रस्त्याची अवस्था खड्यांमुळे बिकट होते. ही कोंडी टाळण्यासाठी यंदा शुक्रवार, २५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून येथील डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली. २९ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र डांबरावर प्रक्रिया करणाऱ्या प्लांटमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील अवजड वाहनांचा विशेष दोन दिवसांसाठी म्हणजेच गुरुवार रात्री ११.५५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला होता. तो ब्लॉक पूर्ण होण्याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीमने घाटातील रस्ता दुरुस्ती मोहीम फत्ते केली.

त्यामुळे कित्येक तास कोंडीत अडकणाऱ्या वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.मुंबई आयआयटीचे सहा अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे १५ अधिकारी कर्मचारी आणि २० ते २५ कामगारांच्या मदतीने पाच ते सहा दिवसांत ही मोहीम पार पडली. दिवसरात्र हे काम सुरु होते. या काळात सहाशे मीटर मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले असून येत्या आठवड्यात ‘मायक्रो सरफेसिंग चे कामही वाहतुकीला अडथळा न होता पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.या कामादरम्यान प्रचंड उन्हाच्या झळांमुळे रस्त्याच्या डांबरीकरण कामावर मोठा परिणाम झाला. कामगारांना दुपारच्या उन्हात तप्त डांबर टाकून रस्त्याचे पुष्टीकरण करणे, अशक्य होते. अन्यथा हे काम याआधीच पूर्ण होण्याची शक्यता होती, असेही अधिकाऱ्यांनी नमूद केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.