लॉजवर येणाऱ्या सर्वांचे डॉक्युमेंट तपासा, पुणे पोलिसांच्या सूचना, कोणी संशयित दिसलं तर…

लॉजवर राहावयास येणारे परदेशी नागरिक यांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या छायांकित प्रति घेऊन रजिस्टरला नोंद करावी, अशा सूचना पुणे पोलिसांनी दिल्या आहेत.लॉजवर राहायला येणाऱ्या सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करा, अशा सूचना पुणे पोलिसांनी लॉज मालक आणि चालकांना दिल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारीची पावलं उचलण्यात आली आहेत.लॉजवर राहायला येणाऱ्या सर्व ग्राहकांची कागदपत्रे व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करा, अशी सूचना पुणे पोलिसांनी लॉजचे मालक-चालक यांना केली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजचे मालक- चालक यांची बैठक घेण्यात आली.पुण्यातील हडपसर पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि लॉज मालक- चालक यांच्यात बैठक झाली. पुणे पोलिसांच्या परिमंडळ 5 कडून हद्दीतील लॉज मालक आणि अधिकारी यांची बैठक झाली.

लॉज येथे राहावयास येणारे परदेशी नागरिक यांचे सी फॉर्म भरून त्यांचे पासपोर्ट व व्हिजा यांच्या छायांकित प्रति घेऊन रजिस्टरला नोंद करावी, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.लॉजचे प्रवेशद्वारावर व सभोवती येणारे जाणारे रस्ते कव्हर होतील अशा पद्धतीने एचडी व नाईट विजन कॅमेरे बसवण्यात यावेत अशा सुद्धा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. लॉजमध्ये संशयित इसम आढळून आल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रुमला कळवा, असेही पोलिसांनी सांगितले आहे.दुसरीकडे, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना हुतात्मा दर्जा देण्याची मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. ‘या हल्ल्यातील मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांसोबत मी उभा आहे. पीडितांना हुतात्मा दर्जा द्यावा, या त्यांच्या मागणीचे समर्थन करतो,’ अशी पोस्ट राहुल यांनी ‘एक्स’वर केली आहे.पाकिस्तानने ‘सुरक्षेच्या कारणास्तव’ संपूर्ण मे महिन्यात दररोज सकाळी ४ ते ८ या चार तासांसाठी कराची आणि लाहोर हवाई क्षेत्राचे विशिष्ट भाग बंद करण्याची घोषणा केली आहे. देशभरातील सर्व विमानतळांना अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले. निर्बंधांच्या कालावधीत विमाने पर्यायी मार्गाने नेली जातील.

पाकिस्तानने बुधवारीच ‘सुरक्षा कारणां’मुळे गिलगिट, स्कार्दू आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मिरातील इतर उत्तर भागांमधून जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे रद्द केली होती.पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल मुहम्मद असीम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) महासंचालक असलेले लेफ्टनंट जनरल मलिक यांच्याकडे ‘एनएसए’चा अतिरिक्त कार्यभार असेल. मलिक यांची ऑक्टोबर २०२४ महासंचालक म्हणून नियुक्ती झाली होती.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.