प्रचंड दुर्गंधी, कशेडी घाटातील दरीत डोकावताच काळवंडलेली बॉडी सापडली; रायगडमध्ये खळबळ.

अलिबाग येथी ल कशेडी घाटात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. ही व्यक्ती कोण आहे, त्याचा मृत्यू कसा झाला याबाबत सध्या काहीही माहिती मळालेली नाही.मुंबई गोवा महामार्गावरील दुरशेत गावच्या नदीकिनाऱ्यावर काही महिन्यांपूर्वी एका महिलेचा मृतदेह बॅगेत कोंबलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली होती. त्यातच आता कशेडी घाटातील दरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडला असल्याने एकच खळबळ उडाली उडाली. या पाया गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांची दमछाक होत असताना, आत्ता पोलिसांसमोर ठिकठीकाणी बेवारस सापडणार्‍या मृतदेहांच्या नातेवाईकांचा शोध लावण्यासोबतच या गुन्ह्यांची उकल करण्याचे आव्हाण समोर ठाकले आहे. तसेच बेवारस मृतदेहांचे नातेवाईक न सापडल्यास कोही मृतदेहांवर अंत्यसंस्कारही पोलिसांना करावे लागत असल्याचे वास्तवही समोर आले आहे.

वरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव गावाच्या हद्दीत दरीच्या बाजूला संरक्षक कठड्यालगत अंदाजे ५० ते ५५ वर्ष वयाच्या एक अज्ञात पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून हा प्रकार आत्महत्या की घातपाताचा असा सवाल उपस्थित होत आहे.याबाबत भोगाव पोलीस पाटील शुभांगी राकेश उतेकर यांनी सदर घटनेची माहिती पोलादपूर पोलीस ठाण्याला कळविल्यानंतर पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे व पोलीस हवालदार आर. के. सर्णेकर, संग्राम बामणे, तुषार सुतार, सौरव जाधव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.यावेळी सदर मृतदेह दोन ते तीन दिवस उन्हाने काळवंडला असून परिसरात प्रचंड दूर्गंधी पसरली होती. पोलादपूर पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.रायगड जिल्ह्यात सापडत असलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे.

एखाद्या व्यक्तीचा खून करुन त्याचा मृतदेह जिल्ह्यातील निर्जन स्थळी टाकण्यात येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यापूर्वी राज्यभर गाजलेल्या शीना बोरा प्रकरणाने हे सिद्ध झाले आहे. शिना बोरा हिची मुंबईत हत्या करुन मृतदेहाची रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे परिसरात टाकून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.रायगड जिल्ह्यात सापडत रायगड जिल्ह्यात सापडत असलेल्या बेवारस मृतदेहांपैकी काही मृतदेह जिल्ह्याबाहेरील गुन्ह्यातील असण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीचा खून करुन त्याचा मृतदेह जिल्ह्यातील निर्जन स्थळी टाकण्यात येत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच परराज्यातील काही नागरिकही जिल्ह्यात रोजगारासाठी स्थळांतरीत झाले आहेत. यामधील एखाद्याचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची ओळख पटत नाही, यामुळे जिल्ह्यात बेवारस मृतदेह सापडण्याचे प्रमाण वाढले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.