रामराजे नाईक निंबाळकरांना समन्स, पोलिसात हजर राहण्याचे आदेश; प्रकरण काय?

 ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांनी समन्स बजावले आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे समर्थक प्रभाकर घार्गे यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे.ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी माजी विधान परिषद सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांनी समन्स जारी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शनिवारी (उद्या) सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राजकीय वर्तुळात हा रामराजे यांना मोठा धक्का मानला जातो. या प्रकरणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सहभागी असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांना वडूज पोलीस ठाण्याकडून सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात समजपत्र देण्यात आले आहे.

आज २ मे रोजी घार्गे यांना वडूज पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला आणि शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केल्यानंतर मिळालेल्या कोठडीनंतर या तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती.पत्रकार तुषार खरात यांना सुरुवातीला अटक केल्यानंतर संबंधित महिलेलाही सातारा पोलिसांनी एक कोटी रुपयांची खंडणी घेताना ताब्यात घेतले होते. त्याच गुन्ह्याचा तपास सातारा पोलिसांकडून वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्या अनुषंगाने वडूज पोलिसांनी न्यायालयाकडे पत्रकार तुषार खरात,

संबंधित महिला आणि अनिल सुभेदार यांच्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार सातारा जिल्हा न्यायालयाने या तिघांनाही वडूज पोलिसांच्या हवाली केल्याची माहिती पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.त्याचबरोबर या प्रकरणात सातारा जिल्ह्याचे राजकारण पहिल्यापासून ज्यांच्या सभोवती फिरत होते अशा विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवार प्रभाकर घार्गे यांनादेखील वडूज पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे नोटीस पाठवल्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी सांगितले.माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या पुणे स्थित घरीही पोलिसांचे पथक चौकशीसाठी काही दिवसांपूर्वी गेले होते. यामुळे या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे. या प्रकरणात आणखी किती मोठे मासे गळाला लागणार हे लोकांसाठी आणि राजकीय वर्तुळासाठी महत्वाचं ठरणार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.