‘पाकबरोबर युद्ध व्हायला हवं, त्यांना घरात घुसून मारलं पाहिजे…’ शरद पोंक्षे रोखठोक बोलले.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. नेमकं काय म्हणाले शरद पोंक्षे जाणून घ्या.शरद पोंक्षे हे मराठी कलाविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. शरद पोंक्षे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्याचबरोबर ते सामाजिक किंवा राजकीय विषयांवर निर्भीडपणे भाष्य करतात. अशातच आता शरद पोंक्षे यांनी एका कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.कोल्हापूर येथे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयोजित केलेल्या स्वातंत्रवीर सावरकर यांच्या वरील गीतांच्या कार्यक्रमाला अभिनेते शरद पोंक्षे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान शरद पोंक्षे म्हणाले की, ‘आता बास झालं, पाकिस्तानच्या घरात घुसून मारलं पाहिजे. आपण सगळ्यांनी व्हिडीओ पाहिले आहेत, ज्यांच्या घरातील लोकांना मारलं आहे त्यांनी सांगितलं की, धर्म विचारला.

पण जर कोणी विचारला नाही असं कोण म्हणतं असतील तर त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. पाकिस्तानशी सगळे संबंध तोडले पाहिजे, पाणी अडवलं पाहिजे.’पाकिस्तानसोबतच्या युद्धाबद्दल शरद पोंक्षे म्हणाले की, ‘पाकिस्तान बरोबर आता युद्ध व्हायला पाहिजे. आपण युद्ध टाळण्यासाठी खूप संधी दिली आहे, आता वेळ आली आहे पाकिस्तान बरोबर युद्ध करण्याची. कोण कलाकार यावर बोलत नाहीत याच्याशी मला देणंघेणं नाही. मी अभिनेता आहे, प्रखर हिंदुत्ववादी आहे. आता इतिहासातील सगळं उट्ट काढण्याची संधी आली आहे. आता नकाशावरून सगळं संपवूनच टाकूया. मोदींवर माझा खूप विश्वास आहे ते सर्व करून दाखवतात जास्त बोलत नाहीत. एकदा लचका कापावा लागतो, ती वेळ आता आली आहे.

जे बांधव या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या आत्म्यांना शांती लाभेल असं पाऊल उचलले जाईल. महागाई, बेरोजगारी हे प्रश्न निर्माण केले जातात असे काही नाही, हे केवळ दाखवलं जातं. हिंदुत्व म्हणजेच पुरोगामित्व आहे; या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. मी हिंदुत्ववादी म्हणजेच पुरोगामी आहे.”अंदमान यात्रा सुरूच आहे. त्याठिकाणी आम्ही तरुण मुलांना घेऊन जातो. त्या ठिकाणी असलेल्या जेलमध्ये तरुणांना लेक्चर देतो. तिथला अनुभव तरुणांना देतो, सावरकर त्याठिकाणी कसे राहिले असतील हे दाखवतो. प्रत्येक आमदाराला अंदमानला घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे तिथली परिस्थिती त्यांच्या लक्षात येईल. तिथं जाऊन आल्यानंतर सावरकरांबद्दल जे बोललं जातं ते बोलणार नाहीत. राहुल गांधी जर अंदमानला येणार असतील तर मी त्यांना घेऊन जाईन. त्यांना खर्च परवडत नसेल तर मी त्यांचा खर्च करतो.’ असं शरद पोंक्षे पुढे म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.