पहलगाम हल्ल्याला आठवडा उलटला, पण हल्लेखोर दहशतवादी सापडेनात; NIAला आता वेगळाच संशय.

पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांचा जीव घेणारे दहशतवादी भारताच्या सुरक्षा यंत्रणांना अद्याप सापडलेले नाहीत. २२ एप्रिलच्या दुपारी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला.श्रीनगर: पहलगाममध्ये २६ निष्पाप नागरिकांचा जीव घेणारे दहशतवादी भारताच्या सुरक्षा यंत्रणांना अद्याप सापडलेले नाहीत. २२ एप्रिलच्या दुपारी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. त्यात २६ जण मारले गेले. या हल्ल्याला आठवडा उलटला आहे. प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरु आहे. पण अद्याप तरी एकही दहशतवादी हाती लागलेला नाही. आता या प्रकरणात एनआयएला वेगळीच शंका आहे.पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला घडवणारे आताही भारतातच आहेत. ते दक्षिण काश्मीरमध्ये लपून बसले आहेत, असा संशय एनआयएमधील सुत्रांनी बोलून दाखवला.

काही दहशतवादी अद्यापही दक्षिण काश्मीरमध्ये लपले असल्याची शक्यता आहे. २२ एप्रिलला बैसरण घाटीत झालेल्या हल्ल्यावेळी काही दहशतवाद्यांनी दुरुन कव्हर फायरिंग दिल्याचा संशय आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांकडे खाण्यापिण्याचं सामान आणि आवश्यक वस्तू असाव्यात. त्यामुळेच त्यांना बाहेरच्या व्यक्तीच्या मदतशिवाय इतके दिवस तग धरता आला आहे. स्वत:कडे आलेल्या खाद्यपदार्थांच्या जोरावरच ते आताही जंगलात लपलेले असावेत, असा संशय आहे.दहशतवाद्यांचा हल्ला अतिशय अचूक होता. त्यांनी तो अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं घडवून आणला. हल्लेखोरांनी पहलगाममध्ये हल्ला घडवत असताना इथले एन्ट्री आणि एक्झिट गेट बंद केले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी आणि हल्ल्यातून बचावलेल्यांनी दिली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, हल्ल्यात ४ दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. हल्ल्यावेळी दोन मुख्य गेटनं आत गेले. एक एक्झिटवर उभा होता. तर चौथा आसपासच्या जंगलात राहून बॅकअप देत होता, असा संशय तपास यंत्रणांना आहे.तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. त्यावेळी काही पर्यटक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते, तर काही जण घोडेस्वारीचा आनंद घेत होते. दोन हल्लेखोरांनी लष्कराचा गणवेश परिधान केला होता. तर तिसरा काश्मिरी पोशाखात होता. पहिली गोळी एक्झिट गेटच्या जवळून झाडली गेली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आणि पर्यटकांची धावाधाव सुरु झाली. जीव वाचवण्यासाठी पर्यटक एन्ट्री गेटच्या दिशेनं धावले. तिथे आधीपासूनच असलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.