‘चुन-चुनकर बदला लेंगे’, अमित शाह प्रचंड आक्रमक, पाकिस्तानवर मोठी कारवाई होण्याची शक्यता.

भारत सरकार आता पाकड्यांचा बदला घेण्याच्या तयारीत आहे. पहलगामध्ये 27 निष्पांचा जीव घेणाऱ्या सर्व दहशतवाद्यांना कठोर शिक्षा दिली जाईल. पाकिस्तानच्या विरोधातदेखील मोठी कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पुन्हा एकदा दिले.जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार पाकिस्तान आणि दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर सध्याच्या घडीला प्रचंड घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तीनही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठक पार पडली आहे. याशिवाय देशाच्या सुरक्षेशी संबंधित बैठका रोज होत आहेत. या बैठकांमध्ये पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई करण्याची रणनीती आखली जात आहे. पहलगामच्या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या घटनेचा बदला घ्यावा, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. जनभावना लक्षात घेता वरिष्ठ पातळीवर तशा घडामोडी घडत आहेत.

भारताच्या या संभाव्य कारवाईच्या धाकाने पाकिस्तान प्रचंड घाबरला आहे. आधी पोकळ धमक्या देणारा पाकिस्तान आता अमेरिकेकडे मध्यस्थीची विनंती करताना दिसतोय. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादविरोधात मोठी कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत.”पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला जाईल. हा नरेंद्र मोदी यांचा भारत आहे”, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले. अमित शाह दिल्ली येथील कार्यक्रमात बोलत होते. “पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊले उचलली आहेत. दहशतवादाविरुद्धची लढाई सुरूच राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून दहशतवाद्यांना सोडले जाणार नाही”, असं अमित शाह देशाला उद्देशून म्हणाले.”आज कुणीही समजू नये की, आमच्या 27 लोकांना मारून त्यांनी ही लढाई जिंकली आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, प्रत्येक गोष्टीचा जवाब मिळेल.

कुणी भ्याड हल्ला करून विचार करत असेल की हा आपला विजय आहे, तर त्यांनी समजावे की, रोखठोक बदला घेतला जाईल. हा नरेंद्र मोदींचा भारत आहे”, असं अमित शाह म्हणाले.”आज जगातील सर्व देश भारताच्या सोबत उभे आहेत. आज पुन्हा एकदा हा संकल्प आठवण करून देतो की, दहशतवादाविरुद्धची आपली लढाई जारी राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, मग तो वामपंथी उग्रवाद असो किंवा काश्मीरचा मुद्दा, जर कुणी भ्याड हरकत करत असेल, तर कुणालाही सोडले जाणार नाही”, असा इशारा अमित शाह यांनी दिला.”इंच-इंच भूमीतून दहशतवाद संपवला जाईल. एकजूट होऊन जगातील सर्व देश दहशतवादाच्या विरोधात भारतासोबत उभे आहेत. जोपर्यंत दहशतवाद संपत नाही, तोपर्यंत त्यांना शिक्षा दिली जाईल”, असंदेखील अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले आहेत. अमित शाह यांचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे. कारण भारत-पाकिस्तान सीमेवर सध्याच्या घडीला तणावाचं वातावरण बघायला मिळत आहे. दोन्ही देशाच्या सैनिकांनी युद्धाची तयारी केली आहे. दोन्ही देशांकडून युद्धाभ्यास सुरु आहे. त्यामुळे काहीही घडू शकतं, असे संकेत मिळत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.