मंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राडा, नेमकं काय घडलं.

 तुळजापूरमधील ड्रग्स प्रकरणानंतर खळबळ उडाली. वैजनाथ सुरवसे यांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत उपोषण सुरू केले. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी वैजनाथ सुरवसे यांना ताब्यात घेतले.तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. यामध्ये काही पुजाऱ्यांची नावे आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुळजापूरमध्ये मोठे ड्रग्ज रॅकेट सुरू होते. शेवटी याची भनक पोलिसांना लागली आणि थेट कारवाई करण्यात आली. यादरम्यान अनेकांनी पोलिसांवर देखील जोरदार टीका केली. इतके मोठे ड्रग्ज रॅकेट सुरू असून पोलिसांनी अगोदरच कारवाई का नाही केली असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. आज परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ता आणि पोलिसांमध्ये मोठा राडा आहे.

थेट पोलिसांची आणि उपोषणकर्त्याची बाचाबाची झाली आणि पोलिसांनी त्याला गाडीत टाकून नेले.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणकर्ता वैजनाथ सुरवसे यांची धाराशिव पोलिसांकडून उचलबांगडी करण्यात आली. तुळजापूर ड्रग्स प्रकरणी तुळजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख हे ड्रग्ज माफियाना पाठीशी घालत आल्याचा आरोप करत वैजनाथ सुरवसे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू होते. मात्र, यादरम्यान त्यांनी काहीही झाले तरीही पालकमंत्र्यांना भेटणार अशी भूमिका घेतली.उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना भेटण्यासाठी उपोषणकर्ते वैजनाथ सुरवसे जात असताना त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली.

काहीही झाले तरी आपण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना भेटणारच म्हणत पोलिसांशी हुज्जत घालताना उपोषणकर्ते वैजनाथ सुरवसे दिसले.बाचाबाची वाढत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी उपोषणकर्त्याची उचलबांगडी केली. यावेळी काही काळ गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. पोलिसांनी गाडीमध्ये टाकून उपोषणकर्त्याला नेले. वैजनाथ सुरवसे हे उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र, पालकमंत्र्यांना भेटण्याच्या मुद्दावरून त्यांची आणि पोलिसांची बाचाबाची झाली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.