संस्थेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात 2 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन.

रावेर येथील कंत्राटी सफाई कामगारांचे आस्था स्वंयम रोजगार सेवा सहकारी संस्थेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात 2 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन

रावेर दि . 7 रावेर नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांनी दि . 5 पासून आस्था स्वयम रोजगार सेवा सहकारी संस्था धुळे ठेकेदाराच्या मनमानी कारभाराच्या विरोधात काम बंद आंदोलन सुरू केल्याने शहरात 2 दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरले होते आज पासुन नगर परिषदेने कायम सफाई कामगारांना कामावर पाठवून शहरवासीयांना थोडासा दिलासा दिला आहे परंतु दोन दिवसांपासून घरा -घरामध्ये पडलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरलेली आहे याकडे देखील नगर परिषदेने लक्ष देण्याची मागणी शहरवासी करीत आहे.

रावेर नगर परिषदेचा सफाई करण्याचा ठेका आस्था स्वयंम रोजगार संस्था धुळे या संस्थेने घेतला आहे. ठेका घेतल्या पासून असंघटीत सफाई कामगार यांना शासनाच्या नियामनुसार रोजंदारी देण्यात येत नाही, तसेच, सुरक्षा कीट पावसाळ्यात रेन कोट, गम बूट, आदी कोणत्याही सुख-सुविधा दिल्या जात नाही. रोजंदारी देखील नियमाप्रमाणे व नियमित दिली जात नाही. प्रत्येक कामगाराचा पी . एफ .ठेकेदाराने भरावा असा नियम असताना आता पर्यंत ठेकेदाराने एका ही सफाई कामगाराचा पी. एफ, ई. एस. आय भरलेला नाही, तसेच, विमा सुरक्षा कवच देखील कामगारांना लागू नाही. एखाद्या सफाई कामगाराला जबर जखम झाल्यास त्याला स्वतः उपचार करावा लागतो. संस्थेचे सफाई कामगार असल्याचा पुरावा म्हणून आय कार्ड, ड्रेस देखील दिलेले नाही. याच्या विरोधात कंत्राटी सफाई कामगारांनी एनएसयुआयचे प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, सावन मेढे, धुमा तायडे यांच्या नेतृत्वात तहसिलदार बंडू कापसे यांना निवेदन देवून आस्था संस्थेच्या ठेकेदारांवर कडक कारवाई व काळ्या यादीत(Black List)टाकण्यात यावे अशी मागणी करून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे . या आंदोलनाच्या निवेदनाच्या प्रती कामगार आयुक्त, बबनराव काकडे उपविभागिय अधिकारी फैजपुर , मुख्याधिकारी नगर परिषद यांना निवेदनाची प्रत देण्यात आली आहे .
यावेळी गौतम गजरे, अजय मेढे , योगेश महाजन, प्रमोद सोनवणे, शुभम घेटे,प्रकाश लहासे, अर्जुन छपरीबंद, चेतन घेटे, सागर तायडे आदींसह असंख्य असंघटित सफाई कामगार उपस्थित होते .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.