दिग्गज कवी : एक गुरु एक शिष्य कवी अशोक दादा सोनवणे यांचा विशेष गौरव….
जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी ; शहरातील गुरुदत्त नगर भागात नील अंश या इमारतीत राहणारे कवि, तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक निळकंठ सोनवणे यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून गौरविण्यात आले. चोपडा शहरातील राज्यात गौरवलेले छायाचित्रकार , तथा म ,सा, प, चे सदस्य यांनी शाल व गुलाब पुष्प देऊन गौरविले. यावेळी, ज्येष्ठ शिष्य कवी, लेखक, साहित्यिक रमेश जे , पाटील हे यावेळी हजर होते. कवी सोनवणे यांनी रमेश जे , पाटील व छोटू वार्डे यांना विद्यादान केले, गुरु माता निर्मला देवी यावेळी हजर होत्या..











