मुंबईने एकाच दगडात दोन पक्षी मारले, पण त्यांचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला की नाही, जाणून घ्या…

मुंबई इंडियन्सने एका दगडात दोन पक्षी मारले. मुंबईच्या संघाने राजस्थानला आयपीएलमधून बाहेर काढले आहे, तर त्यांनी आरसीबीला धक्का दिला. पण ते प्ले ऑफमध्ये पोहोचले की नाही, जाणून घ्या…जयपूर: मुंबई इंडियन्सच्या संघाने राजस्थान रॉयल्सवर मोठा विजय साकारला आणि त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. मुंबईने फक्त एवढेच केले नाही तर त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये आरसीबीलाही धक्का दिला. दुसरीकडे मुंबईचा हा सलग सहावा विजय ठरला. या सर्व गोष्टी मुंबईच्या बाजूने घडल्या, पण मुंबई इंडियन्सचा संघ अजूनही आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये पोहोचला की नाही, हे आता समोर आले आहे.मुंबईच्या संघाच्या नावावर आता ११ सामेन झाले आहेत. मुंबईने या ११ सामन्यांत ७ विजय साकरले, तर चार लढतींमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मुंबईचा हा सातवा विजय ठरला. ्तयामुळे मुंबई इंडियन्सचे आता १४ गुण झाले आहेत.

पॉइंट्स टेबलमध्ये मुंबई आणि आरसीबी या दोन्ही संघांचे समान १४ गुण आहेत, पण मुंबईचा संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे, कारण मुंबईने या सामन्यात मोठा विजय साकारला आणि त्यामुळेच त्यांना रन रेट हा आरसीबीपेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळेच मुंबईने आरसीबीला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे.मुंबईने अव्वल स्थान पटकावले, त्याचबरोबर त्यांचे १४ गुणही झाले आहेत. त्यामुळे आता त्यांनी प्ले ऑफमध्ये स्थान पटकावले आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. पण खरं समीकरण आहे तरी काय, हे आता समोर आले आहे. आयपीएलमध्ये १४ झाल्यावर एखादा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचल्याचे पाहिले आहे.

पण त्यासाठी परिस्थिती नेमकी काय आहे आणि किती संघांचे सामने बाकी आहे, हे महत्वाचे ठरते. मुंबईच्या संघाने १४ गुण मिळवले असले तरी ते प्ले ऑफमध्ये पोहोचले, असे तांत्रिकदृष्ट्या म्हटले नाही जाऊ शकत. कारण १४ गुण होऊनही एखादा संघ बाहेर पडू शकतो, पण मुंबईच्या संघाने प्ले ऑफच्या दिशेने कडक पाऊल टाकले आहे, असे आता आपल्याला म्हणता येऊ शकते. त्यामुळे मुंबईने अजून १-२ सामने जिंकले तर त्यांना प्ले ऑफचे दार खुले होऊ शकते.मुंबईच्या संघाचे १४ गुण तर झाले आहेत, त्यामुळे त्यांनी प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले आहे की, नाही हे आता समोर आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.