पोटी लेक नाही, पण 2500 मुलींचं कन्यादान, 25 वर्षांपासून सव्वा रुपयात लग्न लावणारा ‘बाप’माणूस.

सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आजतागायत 2500 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धर्मीय अशी 65 जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत.स्वतःला मुलगी नाही, मात्र हजारो मुलींची डोली सजवणारा बाप माणूस, तो आहे, जवळपास अडीच हजार मुलींचा बाप.. ही गोष्ट आहे शिर्डीतील कैलास कोते नावाच्या बाप माणसाची.. गेल्या 25 वर्षात कोते यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून हजारो मुलींचे कन्यादान करत सामाजिक बांधिलकी जपलीये.. यंदा या विवाह सोहळ्याचा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने यंदाचा सामुदायिक विवाह सोहळा अधिक थाटात संपन्न झालाय. महागाईच्या या काळात फक्त नाम मात्र सव्वा रुपयात लग्न होत असल्याने यंदा 65 जोडपी विवाहबद्ध झाली.सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या साई बाबांच्या शिर्डीत कोते दाम्पत्याच्या पुढाकारातून आजतागायत 2500 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.

यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षात हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धर्मीय अशी 65 जोडपी विवाह बंधनात अडकली आहेत. स्वतःला मुलगी नसल्याची खंत मनात असताना 25 वर्षांपूर्वी आईकडून प्रेरणा घेऊन कैलास कोते यांनी सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ हाती घेतली. प्रत्येक वर्षी मोठ्या थाटामाटात सर्वधर्मीय विवाह सोहळा संपन्न होतो आणि त्यामुळे कोते दाम्पत्याला हजारो मुलींचे आई वडील होण्याचे भाग्य लाभले आहे.. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील वधू वरांची संख्या लक्षणीय असते..गेल्या 25 वर्षांपासून शिर्डीत सुरू असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात अवघा सव्वा रुपया नाममात्र शुल्क भरून नोंदणी करता येते. कोते दाम्पत्याकडून वधू-वरांना नवे पोशाख, सोन्याच्या मंगळसूत्राची भेट, संसार उपयोगी वस्तू, वऱ्हाडी मंडळींना मिष्टान्न भोजन दिले जाते.

त्यासाठी कोते परिवार आणि नातेवाईक स्वतःच्या मुलींचे लग्न असल्याप्रमाणे तयारी करतात. नवरदेवांची उंट घोड्यावरती मिरवणूक काढली. यावर्षी 65 जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झालाय.ज्यांचा विवाह याठिकाणी पार पडला, त्यांच्या अपेक्षेपेक्षाही छान नियोजन करण्यात आल्याने वधू-वरही समाधानी होते. या विवाह सोहळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील उपस्थिती लावली.अवघ्या एक रुपयात संसासारची सुरुवात होत असल्याने वधू – वरांना आनंद झाल्याचे दिसून आले.या विवाह सोहळ्यात दरवर्षी मोठ्या संख्येने वऱ्हाडी मंडळींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित असतात. एकीकडे वाढती महागाई आणि पाणी टंचाईच्या काळात ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ चा संदेश देणारा शिर्डीतील हा सामुदायिक विवाह सोहळा अनेकांना आधार देणारा ठरलाय एव्हढं मात्र नक्की.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.