आर्द्रतेमुळे अस्वस्थता वाढणार, मे महिन्यातील पहिल्या दहा दिवसांचा अंदाज काय? तज्ज्ञांनी दिली माहिती.

मे महिन्यात मध्य भारत आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे. मुंबईत आर्द्रता वाढली असून उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता असून, पुढील चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे, पालघरसह मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.मे महिन्यामध्ये मध्य भारतात, लगतच्या पूर्व, तसेच वायव्य भारतात उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने यासंदर्भात पूर्वानुमान वर्तवले. मे महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत मुंबईमध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने अधिक अस्वस्थता जाणवू शकेल. या महिन्यात उत्तर कोकण, विदर्भ, तसेच मराठवाड्याचा काही भाग येथे उष्णतेच्या लाटा सरासरीपेक्षा अधिक असू शकतील.मुंबईमध्ये गुरुवारी तापमान ३५ अंशांच्या आत असतानाही असह्य उकाड्याने मुंबईकर हैराण झाले. कुलाबा येथे ३४.१ तर सांताक्रूझ येथे ३३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते.

हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ०.५ आणि ०.४ अंशांनी अधिक होते. कुलाबा येथे ७० टक्क्यांहून अधिक, तर सांताक्रूझ येथे ६५ टक्क्यांच्या आसपास आर्द्रता होती. यामुळे अस्वस्थता वाढली आहे.ढगांची द्रोणीय स्थिती, तसेच चक्रीय वात स्थिती निर्माण झाल्याने पावसाची शक्यता असल्याने येत्या काही दिवसांमध्ये या तापमान तडाख्यामुळे मुंबईकरांची सुटका होण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्कायमेट वेदरचे महेश पलावत यांनी दिली आहे.आग्नेय राजस्थानजवळ चक्रीय वात स्थिती निर्माण झाली आहे. आग्नेय राजस्थानपासून उत्तर केरळपर्यंत उत्तर-दक्षिण डांची द्रोणीय स्थिती आहे. यामुळे वातावरणामध्ये आर्द्रता अधिक आहे.

राज्यावर या प्रणालीचा परिणाम होत आहे. येते चार ते पाच दिवसांत मुंबई, ठाणे, पालघरसह मराठवाडा, विदर्भामध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.दरम्यान, विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ४०-६० किमी प्रतितास वेगाने गारपीट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. राज्यभरात सतत हवामानात कधी अवकाळी, तर कधी तापमानाच्या पारा ४० वर पोहोचल्याचं चित्र आहे. सध्या तापमान चांगलंच वाढलं असून अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.