नगरकरांचे ‘काका’ हरपले, संग्राम जगताप यांना पितृशोक, माजी आमदार अरुण जगताप यांचे पुण्यात निधन.

नगरच्या राजकारणातील एक मोठं नावं म्हणून अरुण जगताप यांच्याकडे पाहिलं जायचं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून अरुण काकांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली.अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील आणि माजी आमदार अरुणकाका जगताप यांचे निधन झाले. आज पहाटे 2 वाजता पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 68 वर्षांचे होते. 5 एप्रिल रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नगरहून पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली.नगरच्या राजकारणातील एक मोठं नावं म्हणून अरुण जगताप यांच्याकडे पाहिलं जायचं. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून अरुण काकांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. आधी ते नगरपालिकेत नगरसेवक झाले, नंतर 5 वर्ष तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष देखील राहिले.

त्यांनी दोन वेळा अहिल्यानगर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. परंतु पुढे ते दोन वेळेस विधान परिषदेवर निवडून येऊन आमदार झाले.जिल्हा क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष राहिले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारी सदस्यपद त्यांनी भूषवले आहे. गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचे ते अध्यक्ष राहिले आहेत. आमदार शिवाजीराव कर्डिले आणि भानुदास कोतकर यांचे ते व्याही होते.मूळचे काँग्रेसचे विचाराचे असणारे अरुण जगताप यांनी मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. मात्र शिवसेनेत काही त्यांचं मन रमलं नाही. अवघ्या सहा महिन्यात ते पुन्हा एकदा स्वगृही आले. अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून अरुण जगताप यांची ओळख राज्याला होती.

पाच एप्रिल रोजी त्यांना अत्यावस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींनी रुग्णालयात जाऊन माजी आमदार जगताप यांच्या तब्ब्येतील बाबत आमदार संग्राम जगताप यांच्याकडून माहिती घेतली होती. परंतु उपचारादरम्यान अरुणकाका जगताप यांचे निधन झाले.आज दुपारी दोन वाजल्यापासून त्यांचे पार्थिव भवानीनगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर चार वाजता अहिल्यानगर येथील अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.