प्ले ऑफमधून बाहेर पडताच राजस्थानला मोठा धक्का, संघाचा स्टार गोलंदाज स्पर्धेतून आऊट.

 आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. संघाला पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे.आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाने खूपच निराशाजनक कामगिरी केली आहे. संघाला 9 पैकी फक्त तीन सामने जिंकता आले आहेत. यामुळे तो पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर आहे. कालचा मुंबईविरुद्धचा राजस्थानचा पराभव त्यांना महाग पडला आहे. राजस्थान आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेले पाहायला मिळत आहे. संघाला पराभवाचा धक्का मिळाल्यानंतर आणखी एक धक्का पचवावा लागणार आहे.संघातील एका वेगवान गोलंदाजाच्या बोटाला दुखापत झाली आहे, ज्यामुळे तो आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. यामुळे आरआरची गोलंदाजी कमकुवत होईल. कारण हा वेगवान गोलंदाज डेथ ओव्हर्समध्ये तज्ज्ञ मानला जातो.

28 एप्रिल रोजी गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा जखमी झाला. संदीप शर्माने गुजरात टायटन्सकडून 16 वे षटक टाकले. त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर गिलने चेंडू ड्राईव्ह केला आणि संदीपने त्याच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. तरीही, त्याने गोलंदाजी सुरू ठेवली आणि चार षटकांचा कोटा पूर्ण केला. या सामन्यात त्याने 4 षटकांत 33 धावा देत एक विकेट घेतली.मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी संदीप शर्मा जेव्हा टीम बसमधून उतरला तेव्हा त्याच्या उजव्या हाताला पट्टी बांधलेली होती.

राजस्थान रॉयल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “बोटात फ्रॅक्चर असूनही संघासाठी आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी आपले शरीर धोक्यात घालणाऱ्या या योद्ध्यासाठी टाळ्या वाजवा”.राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने या हंगामात एकूण 10 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 9.89 च्या इकॉनॉमीने 9 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलमधील त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 137 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8.03 च्या सरासरीने 146 विकेट्स घेतल्या आहेत. संदीप हा डेथ ओव्हर्सचा तज्ञ मानला जातो. म्हणूनच तो 2023 पासून राजस्थान रॉयल्ससोबत राहील.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.